भारतीय क्रिकेटपटूंचे ‘निकनेम’ तुम्हाला माहिती आहेत का? वाचा खेळाडूला कोणते टोपण नाव दिले आहे

क्रिकेट जगतात खेळणारे खेळाडू त्यांच्या नावाबरोबरच टोपण नावानेही ओळखले जातात. क्रिकेटपटू आपापल्या देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात फक्त एकाच नावाने खेळतात, पण जेव्हा ते मैदानाबाहेर असतात तेव्हा त्यांना चाहते, सहकारी, समालोचक, पंच यांनी दिलेल्या टोपणनावांनी ओळखले जातात. या लेखाद्वारे आम्ही क्रिकेटपटूंच्या टोपणनावांवर एक नजर टाकणार आहोत.

महेंद्रसिंग धोनी याला माही, थाला, एमएस, एम एस डी आणि कॅप्टन कूल या टोपण नावाने देखील ओळखले जाते. क्रिकेट मधून निवृत्त होऊन तीन वर्ष झाले तरी धोनीची लोकप्रियता कमी झाली नाही. सध्या तो केवळ आयपीएल मध्ये खेळतोय.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावाचा रतीब घालणाऱ्या विराट कोहलीला किंग कोहली असे देखील म्हणतात तसेच चिकू हे त्याचे टोपण नाव आहे.

भारताचा माजी दिग्गज खेळाडू सौरव गांगुली याला अनेक टोपण नावे आहेत. त्याला संघातील खेळाडू दादा असे म्हणायचे. याशिवाय बंगाल टायगर, कोलकत्ता प्रिन्स, ऑफसाइडचा भगवान अशी विविध टोपण नावे त्याला दिली होती.

मोठमोठे षटकार मारण्यात माहीर असलेला रोहित शर्मा हिटमॅन या टोपण नावाने प्रसिद्ध आहे.

सचिन तेंडुलकर हा मास्टर ब्लास्टर आणि लिटर मास्टर या नावाने देखील आहे.

दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे ‘सनी’ त्यासोबतच ‘लिटल मास्टर’ या नावाने देखील ओळखले जातात.

भारतीय क्रिकेट संघाचा विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या कारकीर्दीत मोठ मोठे धावसंख्या उभारली होती. त्यामुळे त्याना ‘द वॉल’ या टोपण नावाने ओळखले जाते.

‘सिक्सर किंग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या युवराजला युवी या टोपण नावानेही बोलवले जाते.

व्ही व्ही एस लक्ष्मण या भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने 2000 साली कोलकत्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना 283 धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. यावरून त्याला ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ हे नाव देण्यात आले.

शतक ठोकल्यानंतर अथवा कॅच पकडल्यानंतर आपल्या मिशीवर हात फिरवून ताव मारणाऱ्या शिखर धवनला गब्बर या नावाने ओळखले जाते. खराब परफॉर्मन्समुळे तो संघा बाहेर आहे.

भारताचा कसोटीपटू चेतेश्वर पुजाराला पूज्जी या नावाने ओळखले जातोय. सध्या तो केवळ कसोटी संघाचा भाग आहे.

भारताचे माजी प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री यांनी जसप्रीत बुमराह याचे बुम बुम असे नामकरण केले होते.

समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी फिरकीपटू अनिल कुंबळे यांना जम्बो हे नाव दिले होते. गोलंदाजी करताना मोठे मोठे स्टेप्स टाकून गोलंदाजी करायचा म्हणून त्याला हे नाव दिले.

अजिंक्य रहाणे हा जिंक्स नावाने ओळखला जातो. सध्या तो केवळ कसोटी संघाचा भाग आहे.

भारताचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल हा युजी या निकनेमने ओळखला जातो. विश्वचषक स्पर्धेसाठी तो भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरला.

भारताचा दिग्गज फिरकेपटू आर अश्विन हा ‘ऐश’ या नावाने ओळखला जातो.