ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

भारत

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.


नव्वदीच्या दशकात 300 पेक्षा जास्त धावांचा टार्गेट चेस करणं फलंदाजासाठी ही एक अग्नि परीक्षा होती. मात्र T20 क्रिकेटच्या आगमनामुळे वनडे क्रिकेटमध्ये 300 पेक्षा धावांचा स्कोर सहजपणे चेज केला जातोय. नुकतीच एक आकडेवारी समोर आली आहे, त्यामध्ये तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा डोंगर चेज करण्यामध्ये भारत पहिल्या स्थानावर असल्याचे दिसून येते.  क्रिकेटच्या आजवरच्या विक्रमाकडे बघितले तर लक्षात येते की, टीम इंडियाने अनेक वेळा सामने कठीण परिस्थितीतून बाहेर काढलत विजयाला गवसणी घातली आहे.

टीम इंडिया सोडून आणखी असे कोणते देश आहेत ज्यांनी सर्वांत जास्त वेळा 300 हून अधिक धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला आहे. एक नजर टाकूया.

भारत च नाही तर या 5 संघांनी एकदिवशीय सामन्यात 300 हून अधिक स्कोर केलाय पार.

भारतीय संघ: एक दिवसीय क्रिकेटमध्ये 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचे आव्हान गाठण्याचा भीम पराक्रम करण्यात भारतीय संघ अव्वल आहे. भारताने देश विदेशात खेळताना 300 किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा डोंगर पार करण्याची किमया तब्ब्ल 18 वेळा केली आहे. भारताची बहुतांशी आकडेवारी ही अलीकडच्या काळातील आहेत. हा विक्रम भारताच्या नावे करण्यामध्ये विराट कोहलीचे सर्वात मोठे योगदान आहे. या विक्रमाच्या यादीत ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड सारखे दिग्गज संघ भारताच्या आजूबाजूला देखील नाहीत. 

डेंग्यू   ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,'चेस मास्टर'; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

इंग्लंड:  तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावा चेज करण्यामध्ये इंग्लंडचा संघ दुसऱ्या स्थानीत आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी तब्बल 13 वेळा ही कामगिरी सहजरीत्या केली आहे. इंग्लंडने ही कामगिरी सर्वाधिक वेळा मायदेशात खेळताना केली आहे. यातील बरेच सामने हे इंग्लंडच्या सलामीच्या फलंदाजानी एकहाती चेस केले आहेत. चेस मास्टर होण्याच्या बाबतीतएकदिवशीय सामन्यात इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पाकिस्तान: 300 पेक्षा धावा चेस करणाऱ्या संघांच्या यादीमध्ये तिसरा संघ आहे तो म्हणजे भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी ‘पाकिस्तानचा संघ’. तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावा चेंज करण्यामध्ये तो संघ 11 वेळा यशस्वी झाला आहे. एकदिवशीय सामन्यात पाकिस्तानने ही कामगिरी तब्बल 11 वेळा केली आहे. महत्वाचे म्हणजे शेवटची अशी कामगिरी त्यांनी 3दिवसापूर्वी विश्वचषक 2023 मध्ये केली आहे.

हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

ऑस्ट्रेलिया:   एकेकाळी क्रिकेट जगतात अधिराज्य गाजवणारा ऑस्ट्रेलियाचा संघ देखील पाकिस्तान प्रमाणेच अकरा वेळा तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा डोंगर पार करत विजय मिळण्यात यशस्वी ठरला आहे. तर न्यूझीलंडच्या संघाने देखील तितक्याच वेळा म्हणजेच 11 वेळा तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावा यशस्वीरित्या पार केल्या आहेत.

भारत

दक्षिण आफ्रिका: दक्षिण आफ्रिकेच्या संघ सर्वात कमी म्हणजे सात वेळा ही कामगिरी करण्यात यशस्वी ठरला आहे. विशेष म्हणजे बहुतांश वेळा ही कामगिरी दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या मायदेशात केली आहे.

जागतिक दर्जाचे फलंदाज, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने फलंदाजासाठी केलेले अनुकूल नियम, T20 क्रिकेटमध्ये झालेला बदल, अत्याधुनिक प्रकारचे बॅट, ग्राउंड ची कमी झालेली लांबी यामुळे सर्वच संघ तीनशे किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा डोंगर पार करत विजयी पताका फडकवत आहेत.

भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक सुरू आहे. यात केवळ न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा संघच 300 पेक्षा जास्त धावांचा डोंगर पार करण्यात यशस्वी झाले आहेत. भारतात असलेल्या बहुतांश खेळपट्टया या फलंदाजास अनुकूल असल्याने येणाऱ्या आणखी काही सामन्यात अशी कामगिरी करताना काही संघ दिसून येतील. याची शक्यता नाकारता येणार नाही.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत