AFG vs SL: पुण्याच्या मैदानावर अफगाणिस्तानचा धमाका; श्रीलंकेवर सात गडी राखून विजय

0
3

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये अफगाणिस्ताने आपल्या खेळाने सर्वांनाच चकित केले आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान सारख्या मातब्बर संघाचा पराभव करून विश्वचषक स्पर्धेत आता तिसरा उलट फेर झालेला आहे. पुण्याच्या मैदानावर झालेल्या सामन्यात शानदार खेळ करत श्रीलंकेचा सात गडी राखून पराभव केला. अजमतुल्लाह उमरजई ने शानदार फलंदाजी करत 73 धावांची खेळी केली तर कर्णधार हशमतुल्लाह शाहिदी 58 याने देखील अर्धशतकी खेळी करत नाबाद परतला.

अफगाणिस्तानने आणखीन एक मोठा उलट फेर करन्यासाठी 242 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरले होते. पण त्यांची सुरुवात एकदम निराशा जनक झाले. गुरबाज हा मधुशंकाच्या गोलंदाजीवर झिरो धामसंख्यावर परतला. त्यानंतर इब्राहिम जादरान याने रहमद शहा सोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी केले इब्राहिम 39 धावा काढून बाद झाला. रहमत शहा दुसऱ्या बाजूला उभा राहिला. त्याने अर्धशतक पूर्ण केले. रहमद आणि कर्णधार हशमतुल्ला शाहीदि यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकीय भागीदारी रचली.

रहमत याने 74 चेंडूचा सामना करत 62 धावांची खेळी करत माघारी परतला. त्यानंतर कर्णधार शाहीदिने सगळा मोर्चा सांभाळला आणि अजमततुला उमरजई सोबत शतकीय भागीदारी केली. कर्णधार शाहिरी 58 आणि उमरजई हा 73 धावांवर नाबाद राहिला

सामन्याच्या सुरुवातीला अफगाणिस्ताने नाणेफेक जिंकून प्रथम श्रीलंकेला फलंदाजीस पाचारण केले. त्यांची देखील सुरुवात चांगली झाली नाही. दिमुत करुणारत्ने हा 15 धावांवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी पाथुम निशंकाने कर्णधार कुशल मेंडिस सोबत अर्धशतकीय साजरी केली. पाथुम निशंकाने चाळीस धावा काढल्या तर मेंडीसने 39 धावांची भर घालून माघारी परतला.

सामन्यात समर्विक्रमा याने 36 धावांचे योगदान दिले समर्विक्रमा बाद होताच श्रीलंकेचा मधला क्रम पत्याप्रमाणे संपूर्ण संघ कोसळून गेला. श्रीलंकेचा संघ 241 धावांवर सर्व बाद झाला. अफगाणिस्तान कडून फजल फारुकी याने सर्वाधिक चार विकेट बाद केले. मुजीब उर रहमान यांच्या नावावर दोन विकेटची नोंद झाली. अफगाणिस्तानचा हा सहा सामन्यातील तिसरा विजय आहे. तिन विजयासह अफगाणिस्तानचे एकूण सहा गुण झाले आहेत.

श्रीलंकेचा पुढचा सामना बलाढ्य भारताविरुद्ध 5 नोव्हेंबर रोजी कोलकाताच्या मैदानावर होणार आहे.  या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे कारण भारताने आत्तापर्यंत विश्वचषकातील सर्वच म्हणजे सहा सामने जिंकून गुणतालिकेत टॉप वर पोहोचणारा पहिला संघ आहे. भारतीय संघ तुफान फार्मात असून त्यांना रोखणे श्रीलंका पुढे एक मोठे आव्हान असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here