IND vs AUS live: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील मालिकेतील शेवटचा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात ऋषभ पंतची तुफानी शैली पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर येताच पंतने स्कॉट बोलंडला षटकार ठोकला. यानंतरही पंत इथेच थांबला नाही, त्याने प्रत्येक ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा पुरेपूर समाचार घेतला.
IND vs AUS पाचव्या कसोटीमध्ये रिषभ पंतने रचला इतिहास .
भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील पाचव्या कसोटीच्य दुसऱ्या डावात पंतने अवघ्या 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यासह पंतने आपल्या नावावर एक विशेष विक्रम नोंदवला आहे.
Rollercoaster performance of Rishabh Pant has came to an end.
He has scored half of the team’s score.
Don’t know what other batters are doing…..#RishabhPant #INDvsAUS pic.twitter.com/IsG3Fz3eSE
— Abhay 𝕏 (@Kings_Gambit__) January 4, 2025
सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात ऋषभ पंतने शानदार फलंदाजी करत अवघ्या 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. आता पंत ऑस्ट्रेलियात सर्वात जलद कसोटी अर्धशतक करणारा पाहुणा फलंदाज बनला आहे.
यापूर्वी हा विक्रम इंग्लंडच्या जॉन ब्राउन आणि वेस्ट इंडिजच्या रॉय फ्रेडरिक्सच्या नावावर होता, ज्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 33 चेंडूत अर्धशतक ठोकले होते. पण रिषभ ने केवळ 29 चेंडूत अर्धशतक झळकावल्यामुळे हा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे.