विश्वचषक स्पर्धा मध्यंतरी सोडून बांगलादेशचा कर्णधार परतला मायदेशी

ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार 'शाकिब अल हसन'कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशची सुरुवात कामगिरी ही अत्यंत निराशा जनक राहिली आहे. अफगाणिस्तान विरुद्ध चा पहिला सामना जिंकल्यानंतर पुढच्या चारही सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव झाला आहे. बांगलादेशचा आता पुढचा सामना येत्या रविवारी 29 सप्टेंबर रोजी कोलकत्याच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यापूर्वी धक्कादायक माहिती समोर आली आहे ती म्हणजे कर्णधार शाकीब उल हसन मायदेशी परतला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यानंतर बांगलादेशचा संघ हा कोलकत्याकडे रवाना झाला तर शाकीब हा बांगलादेशला गेला. बांगलादेशी कर्णधार शाकिब हा मायदेशी परतल्याने सर्वजण चकित झाले आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यात तो दुखापतीमुळे खेळू शकला नाही. तसेच त्याचे देखील कामगिरी या स्पर्धेत अत्यंत निराशा जनक आहे. विश्व कप स्पर्धेतील चार सामन्यात त्याने केवळ 56 धावा काढल्या आहेत यात 40 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच चार सामन्यात त्याला केवळ सहाच विकेट मिळवता आले.

बांगलादेशचा संघ बुधवारी कोलकत्ता मध्ये पोहोचला. तर कर्णधार शाकीब हा दुपारी दीड वाजता ढाक्यामध्ये पोहोचला. ढाक्यामधील शेरे बांगला नॅशनल स्टेडियम वर जाऊन जवळपास तीन तास तो सराव करत होता. शाकिब त्याचा मेंटल नजमूल अबेदिन फहीम याच्या मार्गदर्शनाखाली ट्रेनिंग घेत आहे.

फहिम क्रिक इन्फोशी बोलताना म्हणाला की,”शाकीबने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही त्याच्या बॅटिंग वर काम करत आहोत. त्याने तीन तास माझ्याबरोबर सराव केला आहे. कोलकतामध्ये होणाऱ्या सामन्याच्या सरावासाठी तो बांगलादेशला आला आहे. तो 29 तारखेपूर्वी कोलकत्ता मध्ये दाखल होईल.”

बांगलादेशचा पुढचा सामना 29 सप्टेंबरला नेदरलँड येथे होणार आहे त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे हे दोन्हीही सामने कोलकत्याच्या मैदानावर रंगणार आहेत. विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशचे चार सामने राहिले आहेत. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी बांगलादेशला कोणत्याही परिस्थितीत हे चारही सामने जिंकावे लागणार आहेत. एकाही सामन्यात पराभव झाला तर त्यांना सेमी फायनलचे तिकीट मिळणार नाही. बांगलादेशचा संघ प्रत्येक वर्ल्डकप मध्ये कोणत्यातरी बलाढ्य संघाचा पराभव करत उलटफेर घडवून आणण्यात माहीर होता. मात्र यंदाच्या स्पर्धेत त्यांना कोणतीच चमक दाखवता आली नाही.

यंदाचा विश्वचषक भारतात होत असल्याने  त्याचा फायदा आशिया खंडातील देशातील संघांना होईल असा विचार केला होता. मात्र भारत वगळता खंडातील कोणत्याही संघाला चमकदार कामगिरी करता आली नाही. श्रीलंका पाकिस्तान  हे बलाढ्य संघ  स्पर्धेत अत्यंत कमकुवत दिसत आहेत.