इंग्लंड विरुद्धच्या सामन्यापूर्वी विराट कोहलीने तासंतास केली नेट सेशनमध्ये गोलंदाजी? जाणून घ्या कारण

आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ तुफान फार्मात आहे. भारतीय संघाने पहिले पाच सामने जिंकत विजयाचा पंच लगावला आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानला जाणारा भारतीय संघ फलंदाजी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आता भारताचा पुढचा सामना रविवारी 29 ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध लखनऊच्या मैदानावर होणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड असले तरी भारतीय संघाने हा सामना जिंकण्यासाठी कोणतीच कसर सोडत नाही.

लखनऊची खेळपट्टी ही लाल काळया मातीने तयार केली आहे. त्यामुळे तो फिरकी गोलंदाजीला अनुकूल ठरते. फिरकीला अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर रोहित शर्मा 3 फिरकीपट्टू सह या सामन्यात उतरू शकतो. भारतीय संघातील फिरकीपटू कुलदीप यादव रवींद्र जडेजा रविचंद्र अश्विन हे जबरदस्त फॉर्म आहेत. आतापर्यंतच्या सामन्यात त्यांनी आपल्या जादुई फिरकी गोलंदाजीने विरोधी संघाच्या फलंदाजांना चक्रावून सोडले आहे. जडेजा, कुलदीप सोबत आर. आश्विन देखील संघात खेळताना पाहायला मिळेल.

लखनऊच्या सामन्यासाठी भारतीय संघ बुधवारी दाखल झाला. पहिल्या दिवसाच्या विश्रांतीनंतर संघाने गुरुवारी जोरदार अभ्यास केला. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा हे दोघेही जवळपास 45 मिनिट खेळपट्टी आणि मैदानाचे निरीक्षण करत होते.

रविचंद्रन अश्विन हा बराच वेळ गोलंदाजी करत होता. त्याने शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव ला नेटस मध्ये बराच वेळ गोलंदाजी केली. पारस म्हाम्ब्रे यांच्या देखरेखीखाली भारतीय दिग्गज फिरकेपटू सराव करत होता. अश्विन सराव करत असलेला पाहून तो उद्याच्या इंग्लंडविरुद्धच्या होणाऱ्या सामन्यात संघामध्ये खेळताना दिसेल असे तर्क वितर्क लावले जात आहेत.

भारतीय संघाच्या या सराव सत्रात माजी कर्णधार विराट कोहलीने विद्यमान कर्णधार रोहित शर्मा याला नेट्स मध्ये बराच वेळ गोलंदाजी करत होता. यावेळी भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक देखील नेटस मध्ये हजर होते. प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली विराटने जवळपास चार षटकांची गोलंदाजी केली. हार्दिक पांड्या हा अनफिट असल्यामुळे रोहित शर्मा विराट कोहली चा पार्ट टाइम गोलंदाज म्हणून उपयोग करू शकतो. त्यासाठी त्याच्याकडून गोलंदाजीचा सर्व नेट्स मध्ये करून घेतला जात आहे.

इकाना स्टेडियम वरील पाच नंबरच्या खेळपट्टीवर श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्या सामना खेळला गेला होता. या खेळपट्टीवर पहिल्या दहा षटकात फलंदाजी करणे देखील अवघड झाले होते. मात्र हा सामना सकाळी साडेदहा वाजता सुरू झाला होता. भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे. या खेळपट्टीवर पहिले एक तास फलंदाजी करणे अवघड आहे. एकदा का या खेळपट्टीवर फलंदाजांनी आपला जम बसवला तर धावा काढणे अवघड नाही. यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी चा निर्णय घेऊ शकतो.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या एक दिवसीय सामन्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता भारताचे पारडे मजबूत असल्याचे दिसून येते. भारत आणि इंग्लंड विरुद्ध घरच्या मैदानावर एकूण 51 सामने खेळले आहेत त्यापैकी 33 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे तर 17 सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.