गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडणाऱ्या गोलंदाजाचे आयपीएल पदार्पण गेले फेल, एका षटकात दिल्या तब्बल 22 धावा..!

T20 World Cup 2024 गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडणाऱ्या गोलंदाजाचे आयपीएल पदार्पण गेले फेल, एका षटकात दिल्या तब्बल 22 धावा..!

आयपीएल मध्ये लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (LSG vs KKR) यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये वेस्टइंडीजचा वेगवान गोलंदाज शमर जोसेफ याने पदार्पण केले. मात्र पदार्पणाच्या सामन्यात जोसेफला छाप सोडता आली नाही. मयंक यादव याला दुखापत झाल्यानंतर केएल राहुल याने जोसेफला पदार्पणाची संधी दिली. मात्र पदार्पणाच्या सामन्यातच त्यांच्या नावे नकोश्या विक्रमाची नोंद झाली आहे. त्याने एकाच चेंडूत 15 धावा देण्याचा विक्रम केला.

शमर जोसफ ने लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळताना पहिले षटक टाकले. यात त्याने आपल्या वेगाने साऱ्यांनाच प्रभावित केले. प्रत्येक चेंडू दीडशे पेक्षा अधिक वेगाने फेकत होता. पण त्याच्या या वेगवान गोलंदाजीचा असर केकेआरचे सलामीचे फलंदाज सुनील नरेन आणि फील सॉल्ट यांच्यावर दिसून आला नाही. त्यांनी त्याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला.

जोसेफने आपल्या वेगाने साऱ्यांनाच प्रभावित केले. मात्र त्याची गोलंदाजी दिशाहीन ठरली. त्याने पहिल्या षटकात तब्बल 22 धावा दिल्या. त्याने पहिल्या 5 चेंडूत आठ धावा दिल्या. त्यात एक चौकार, दोन धावा आणि दोन लेग बाय चा देखील समावेश होता. त्यानंतर षटकातील शेवटच्या चेंडूवर त्याने 15 धावा दिल्या.

शमरने या चेंडूत पहिला नो बॉल, दुसरा वाईड, 5 वाईड नोबॉल आणि पुन्हा सहा धावा दिल्या. या षटकात त्याने एकूण दहा चेंडू फेकले. आयपीएल इतिहासातील हे दुसरे सर्वात लांब षटक ठरले. यापूर्वी तुषार देशपांडे ने दोनदा 11-11 चेंडू एकाच षटकार टाकले होते. मोहम्मद शमीने देखील एका षटकात 11 चेंडू टाकण्याचा पराक्रम केला होता.

शमर जोसेफ हा वेस्टइंडीजचा युवा वेगवान गोलंदाज आहे. त्याने यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले होते. पहिल्या सामन्यात त्याने पाच विकेट घेत रातोरात स्टार झाला होता. 24 वर्षाच्या या खेळाडूंने जानेवारीमध्ये ब्रिजबेनच्या गाबा मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज गोलंदाजी करत दुसऱ्या डावा सात विकेट घेत असल्याचे कांगारू फलंदाजांचे कंबरडे मोडून काढले होते. त्याच्या या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर 27 वर्षानंतर वेस्टइंडीजने ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्याच मैदानावर कसोटीत पराभूत केले.

गाबा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा घमंड तोडणाऱ्या गोलंदाजाचे आयपीएल पदार्पण गेले फेल, एका षटकात दिल्या तब्बल 22 धावा..!

जोसेफने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत दोन कसोटी साम्य खेळले आहेत. यात 17.30 च्या सरासरीने 13 विकेट घेतल्याची नोंद आहे. त्याच्याकडे टी-20 क्रिकेटचा छोटासा अनुभव आहे. मात्र त्यामध्ये त्याला फारसे यश मिळाले नाही. जोसेफला लखनऊच्या संघाने आयपीएल 2024 मध्ये इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड याला रिप्लेसमेंट म्हणून संघात सामील करून घेतले होते. वेस्टइंडीजच्या या गोलंदाजाला 3 कोटी रुपयांमध्ये खरेदी करत संघात सामील करून घेतले. क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो वॉचमन चे काम करत होता.


====

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

IPL 2024: मुंबई इंडियन्सने अचानक केला संघात बदल, या दिग्गज खेळाडूला बाहेर काढून या इंग्लंड च्या खेळाडूला दिली संधी.

आयपीएलमधील पहिले षटक निर्धाव टाकणारा वेगवान गोलंदाज ‘कामरान खान’ आहे तरी कुठे? सध्या करतोय अशी कामे…!