PAK vs ZIM: पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत2-0अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानने 10 गडी राखून विजय मिळवत ऐतिहासिक विक्रम केला.
PAK vs ZIM : पाकिस्तानने झिमब्वाम्ब्वेचा केला मोठा पराभव..
दुसऱ्या T20 मध्ये यजमान झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करताना केवळ 57 धावांत आपले सर्व विकेट गमावले. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला अवघ्या 12.4 षटकांत सर्वबाद केले.
प्रतीत्युरात 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने तुफानी खेळ केला. सलामीवीर सैम अयुब (नाबाद 36 धावा, 18 चेंडू) आणि ओमेर युसूफ (22 धावा नाबाद, 15 चेंडू) यांनी अवघ्या 5.3 षटकांत लक्ष्य गाठले.
PAK vs ZIM: पाकिस्तानने रचला T20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
या विजयासह पाकिस्तानने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनोखा इतिहास रचला आहे. पूर्ण सदस्य संघांमध्ये पाकिस्तान हा पहिला संघ बनला आहे, ज्याने पॉवरप्लेमध्ये (पहिली 6 षटके) विजय नोंदवला.
PAK vs ZIM: सुफियान मुकीम ठरला सामन्याचा हिरो !
25 वर्षीय डावखुरा फिरकीपटू सुफियान मुकीमने पाकिस्तानच्या या शानदार विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आपल्या चार षटकात केवळ 3 धावा देत 5 बळी घेत संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.