IPL Teams Brand Value: इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि महागडी क्रिकेट लीग आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू दरवर्षी वाढत आहे. 2008 पासून सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये आधी 8 संघांचा समावेश होता त्यानंतर 2022 पासून या स्पर्धेत 10 संघ सहभागी होत आहेत. 2022 साली गुजरात टायटन्स (GT) आणि लखनौ सुपर जाईटस(LSG) यांचा अधिकारक रित्या आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला. पण तुम्हाला माहितीये का ? आता या 10 संघांपैकी कोणत्या संघाची Brand Value सर्वाधिक जास्त आहे?चला तर जाणून घेऊया या रिपोर्टच्या माध्यमातून.
IPL Teams Brand Value: चेन्नई सुपर किंग्सची Brand Value आहे सर्वाधिक जास्त!
या संघांमध्ये, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ची Brand Value सर्वाधिक आहे. हा संघ पहिल्या हंगामापासून (IPL 2008) महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात खेळत आला होता. यादरम्यान त्यांनी 5 वेळा विजेतेपद पटकावले. आता मागील हंगामापासून धोनीने कर्णधारपद सोडून मराठमोळा ऋतुराज गायकवाड याला कर्णधारपदी बसवले आहे.
IPL Teams Brand Value: मागील 18 वर्षांत IPL संघांच्या Brand Value मध्ये प्रचंड वाढ!
- IPL लीगची Brand Value किती?
ब्रँड फायनान्सच्या अहवालानुसार, 2023 ते 2024 पर्यंत IPL च्या एकूण ब्रँड मूल्यात 13% वाढ झाली आहे. 2023 मध्ये IPL चे ब्रँड व्हॅल्यू $ 10.7 बिलियन (सुमारे 90,679 कोटी) होते, जे 2024 मध्ये $ 12 बिलियन (सुमारे 1.01 लाख कोटी) पर्यंत वाढले. ब्रँड फायनान्स 2008 मध्ये सुरू झाल्यापासून स्पर्धेच्या ब्रँड मूल्यावर अहवाल जारी करत आहे. सुरुवातीला आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू 2 अब्ज डॉलर्स (सुमारे 16,943 कोटी रुपये) होती.
टॉप-4 संघांचे ब्रँड मूल्य ( TOP 4 IPL Teams Brand Value)
चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमध्ये सर्वाधिक ब्रँड मूल्य असलेल्या टॉप-4 संघांमध्ये पहिल्या स्थानावर आहे, ज्यांचे ब्रँड मूल्य 122 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1,033 कोटी रुपये) आहे. दुसऱ्या क्रमांकावर मुंबई इंडियन्स आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 119 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 1,008 कोटी रुपये) आहे. तिसऱ्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 117 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 991 कोटी रुपये) आहे. चौथ्या स्थानावर कोलकाता नाईट रायडर्स आहे, ज्याची ब्रँड व्हॅल्यू 923 कोटी रुपये आहे.
या टॉप-4 संघांचेच जगभरात सर्वाधिक चाहते आहेत. यांच्या व्यतिरिक्त इतर संघांची ही Brand Value किती आहे यावर एक नजर टाकूया..
सनरायझर्स हैदराबादः 619कोटी रुपये (पाचवे स्थान)
राजस्थान रॉयल्स: रु. 686 कोटी (6वे स्थान)
दिल्ली कॅपिटल्स: रु. 677 कोटी (7वे स्थान)
गुजरात टायटन्स: रु 584 कोटी (8 वे स्थान)
पंजाब किंग्स: रु. 576 कोटी (9वे स्थान)
लखनौ सुपर जायंट्स: रु 508 कोटी (10वे स्थान)
हेही वाचा: