Brian Lara Records: क्रिकेटच्या मैदानावर कधी आणि कोणता विक्रम होईल हे सांगणे कठीण आहे. जागतिक क्रिकेटमध्ये अनेक महान खेळाडू झाले आहेत. मैदानावरील आपल्या उत्कृष्ट खेळाने हे खेळाडू नेहमीच चर्चेत राहिले आहेत. या महान खेळाडूंपैकी एक म्हणजे वेस्ट इंडिजचा फलंदाज ब्रायन लारा ( Brian Lara).
ब्रायन लारा हा सातत्यपूर्ण फलंदाज म्हणून ओळखला जातो आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावर त्याने क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम ( Brian Lara Records) केले आहेत. यातील काही विक्रम आजपर्यंत कोणत्याही खेळाडूने मोडलेले नाहीत. ब्रायन लाराच्या या विक्रमांमध्ये (Brian Lara Records) त्याच्या 501धावांच्या नाबाद खेळीचा समावेश आहे, ज्याच्या निर्मितीसह ब्रायन लारा जागतिक क्रिकेटमध्ये अजरामर झाला.
एका कसोटी डावात 400 धावा करण्याचा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर आहे. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. यासोबतच एका डावात 500 धावा करण्याचा विक्रमही ब्रायन लाराच्या नावावर आहे. 6 जून 1994 या दिवशी ब्रायन लाराने 501 नाबाद धावांची डोंगराएवढी इनिंग खेळून क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी लिहून घेतले.
Brian Lara Records: ब्रायन लाराचा 501 धावांचा विक्रम कुणीही मोडू शकले नाहीये.
वॉर्विकशायर, इंग्लंडसाठी डरहमविरुद्ध ब्रायन लाराची नाबाद 501 धावांची खेळी ही प्रथम श्रेणीतील आतापर्यंत खेळलेली सर्वात मोठी खेळी आहे. हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. लाराच्या आधी हा विक्रम पाकिस्तानी फलंदाज हनिफ मोहम्मदच्या नावावर होता, ज्याने 499 धावांची खेळी केली होती. हनीफ मोहम्मदचा विक्रम 35 वर्षे अबाधित राहिला, पण अखेर ब्रायन लाराने आपल्या शानदार फलंदाजीने हनिफचा विक्रम मोडीत काढला.
Brian Lara Records: असा होता लाराचा 500 धावा काढण्याचा खेळीचा लेखाजोगा.
वॉर्विकशायर आणि डरहम यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात डरहमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना डरहमने 8 विकेट्सवर 556 धावा केल्या आणि डाव घोषित केला. प्रत्युत्तरात लाराने वॉर्विकशायरसाठी शानदार फलंदाजी केली. आपल्या डावाच्या पहिल्या दिवशी फलंदाजीला आलेल्या लाराने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 111 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सामन्यात पावसाचा व्यत्ययही पाहायला मिळाला. मात्र, लाराने पहिल्या सत्रात आक्रमक फलंदाजी करत 174 धावांची भर घातली. यानंतर दुसऱ्या सत्रात आणखी 133 धावा झाल्या. चहापान संपेपर्यंत लाराने 400 धावांचा टप्पा ओलांडला होता आणि 500 धावा करण्यासाठी आणखी 82 धावांची गरज होती.
यानंतर लाराने 500 धावांच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू केली. काही वेळातच लाराने 497 धावांपर्यंत मजल मारली. दिवसाचा खेळ नुकताच संपणार होता आणि डरहमच्या गोलंदाजीची कमान कीथ पायपरकडे होती. लाराला वाटले की सामन्यात अजून 2-3 षटके बाकी आहेत पण पहिले तीन बॉल डॉट्स खेळल्यानंतर, पाईपरने त्याला आठवण करून दिली की जर, सामन्याचा निकाल लागला नाही तर हे दिवसाचे शेवटचे षटक असू शकते. यानंतर चौथा चेंडू लाराच्या हेल्मेटला लागला आणि पाचवा चेंडू सीमापार गेला. यासह लाराने 501 धावांची नाबाद खेळी पूर्ण केली.
लाराने चौकार मारताच डाव घोषित झाला आणि सामना तिथेच संपला. या सामन्यात वॉरविकशायरने लाराच्या खेळीमुळे 4 विकेट गमावून 810 धावा केल्या. लाराने आपल्या डावात 427 चेंडू खेळले आणि 62 चौकारांसह 10 षटकार ठोकले.
मात्र या सामन्यातील विशेष बाब म्हणजे या डावात लाराला अनेकवेळा जीवदान मिळाले. लारा फक्त 10 धावांवर असताना तो क्लीन बोल्ड झाला पण चेंडू नो-बॉल होता. त्यानंतर यष्टीरक्षक ख्रिस स्कॉटने 16 धावांवर लाराचा झेल सोडला. त्यांनतर लाराने सर्व सूत्र हातात घेत जबरदस्त फलंदाजी केली आणि लाराच्या त्याच 501 धावांच्या नाबाद खेळीमुळे विरोधी संघाला मोठीकिंमत चुकवावी लागली आणि सामना गमवावा लागला होता.
हेही वाचा: