Smriti Mandhana World Record: टीम इंडियाची ओपनिंग बॅट्समन स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात मंधानाने असे स्थान मिळवले आहे जे जगातील इतर कोणत्याही महिला खेळाडूला गाठता आलेले नाही. मंधानाने(Smriti Mandhana) शानदार फलंदाजी करत शतक झळकावले. 109 चेंडूंचा सामना करताना भारतीय फलंदाजाने 105 धावांची शानदार खेळी केली.
Smriti Mandhana ठरली एका वर्षात सर्वाधिक शकते ठोकणारी महिला खेळाडू.
या शतकिय खेळीसह स्मृती मानधनाच्या नावावर आहे महिला क्रीकेतमधील सर्वांत मोठा विक्रम झाला आहे. एका कॅलेंडर वर्षात चार शतके झळकावणारी मंधाना (Smriti Mandhana) पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे.
मात्र, तिचीही खेळीही भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून देऊ शकली नाही आणि ऑस्ट्रेलियाने 83 धावा करत या सामन्यासह मालिका 3-0 ने जिंकली.
Smriti Mandhana World Record: मानधनाच्या नावावर विश्वविक्रमाची भर!
स्मृती मानधना (Smriti Mandhana) तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघासाठी एकटी लढताना दिसली. मंधानाने शानदार फलंदाजी करत 105 चेंडूत 109 धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान मंधानाने 14 चौकार आणि एक षटकार लगावला. स्मृतीचे हे वर्षातील चौथे शतक होते. यासह ती एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके झळकावणारी फलंदाज बनली आहे. यापूर्वी मंधानाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलग दोन शतके झळकावली होती, तर न्यूझीलंडविरुद्ध एक शतक तिच्या बॅटने झळकावले होते.
IND vs AUS: भारतीय संघाचे गमावली सिरीज!
स्मृती मानधनाची तिसऱ्या सामन्यातील शतकी खेळी व्यर्थ गेली. भारतीय संघाला तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून 83 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 6 गडी गमावून 298 धावा केल्या. ॲनाबेले सरदलँडने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले, तर ॲशले गार्डनरने 64 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले.
तर ताहिला मॅकग्राने नाबाद ५६ धावा केल्या. 299 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संपूर्ण भारतीय संघ केवळ 215 धावांवरच गडगडला. मानधनने आपल्या बॅटने 105 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला दुसऱ्या टोकाकडून उर्वरित फलंदाजांची साथ मिळू शकली नाही. हरलीन देओलने 39 धावा केल्या. या विजयासह ऑस्ट्रेलियाने वनडे मालिका 3-0 ने जिंकली.
हेही वाचा:
- India vs Australia 3rd Test Match: तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल, रोहित शर्मा या 2 खेळाडूंना काढणार बाहेर..!
- IND Vs AUS Women 2nd ODI: पुरुष संघानंतर आता ऑस्ट्रोलीयाच्या महिला संघानेही भारतीय महिला संघाचा केला परभव, एकाच दिवशी दोन्ही भारतीय संघ पराभूत..
- Babar Azam Net Worth: तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे बाबर आझम, महागड्या गाड्या ते कोट्यावधींचे घरे.