IND vs AUS 3rd Test: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रोलीयामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT2024-25) खेळत आहे. ऑस्ट्रोलीयाविरूद्ध बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये जसप्रीत बुमराहची (jasprit bumrah) कामगिरी अप्रतिम राहिली आहे. बुमराहने पर्थमध्ये शानदार गोलंदाजी करत आठ विकेट घेतल्या, तर ॲडलेडमध्येही तो टीम इंडियासाठी एकटा लढताना दिसला.
IND vs AUS 3rd Test: दुसऱ्या कसोटीत बूमराह झाला होता जखमी..
मात्र, दुसऱ्या कसोटीदरम्यान बुमराह मैदानावरच काहीशा अडचणीत दिसला. फिजिओला मैदानावर यावे लागले आणि बुमराहवर सात ते आठ मिनिटे उपचार करण्यात आले. हे पाहिल्यानंतर आता बुमराह गाबा कसोटीसाठी पूर्णपणे तंदुरुस्त आहे का? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण होत आहे. मात्र यावर आता भारतीय संघाने खुलासा केला आहे.
बुमराहबाबत भारतीय संघ आणि चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आली आहे. ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी सराव सत्रात बुमराह गोलंदाजी करताना दिसला. गोलंदाजी करताना बुमराह पूर्णपणे फिट दिसला. बुमराहने ॲडलेड कसोटीच्या पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या. त्याचवेळी पर्थमध्ये बूम-बूम बुमराहची कामगिरी अप्रतिम होती. मात्र, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.
IND vs AUS 3rd Test मध्ये भारतीय संघाला बुमराह कडून जास्त अपेक्षा.!
तिसरा कसोटी सामना उद्यापासून म्हणजेच (13डिसेंबर ) पासून खेळवला जाणार आहे. गाबाच्या या मैदानावर भारतीय संघाला कोणत्याही स्थितीमध्ये विजय मिळवावा लागेल. तरच टे वर्ल्ड टेस्ट चेम्पीयनशिपचा अंतिम सामना खेळण्याच्या शर्यतीत कायम राहतील… हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 5:50 वाजता सुरु होणार आहे.
हेही वाचा:
Smriti Mandhana ने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर..!