IPL 2025 Mumbai Indians New Coach: मुंबई इंडियन्स IPL 2025 साठी आपला संघ मजबूत करण्यात व्यस्त आहे. नव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सला आता नवा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक मिळाला आहे
IPL 2025 Mumbai Indians New Coach: कार्ल हॉपकिन्सनची मुंबई इंडियन्सच्या फिल्डिंग प्रशिक्षक पदी निवड.
. इंग्लंडचे माजी प्रशिक्षक कार्ल हॉपकिन्सन यांना आता मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्यामुळे संघाचा क्षेत्ररक्षण विभाग अधिक मजबूत होणार आहे. याआधी जेम्स पॅमेंट 7 वर्षे मुंबई इंडियन्सचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते, मात्र आता त्यांनी फ्रेंचायझी सोडली आहे.
Joining our support staff department, our new Fielding Coach ➡️ 𝐂𝐀𝐑𝐋 𝐇𝐎𝐏𝐊𝐈𝐍𝐒𝐎𝐍 🙌
📰 𝚁𝙴𝙰𝙳 𝙼𝙾𝚁𝙴 – https://t.co/xzH2AY1MRb#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/zrk8Pb0ADQ
— Mumbai Indians (@mipaltan) December 13, 2024
कार्ल हॉपकिन्सन हा दोन वेळा विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा भाग होता. इंग्लंडने 2019चा एकदिवसीय विश्वचषक आणि 2022चा टी-20 विश्वचषक जिंकला होता. या काळात कार्ल इंग्लंडचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक होते.
जुने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पेमेंट यांना अलविदा म्हणत मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यात लिहिले होते,
“आमचे दीर्घकाळ सेवा करणारे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक जेम्स पॅमेंट यांनी सात वर्षांच्या अमूल्य योगदानानंतर #OneFamily ला निरोप दिला जिथे त्याने 2019 आणि 2020 मध्ये दोन ट्रॉफी जिंकल्या. आम्ही त्याचे आभार मानू इच्छितो आणि त्याच्या भावी प्रयत्नांसाठी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो.
कार्ल हॉपकिन्सनला कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची कामगिरी चांगली होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये, कार्लने 62 सामन्यात फलंदाजी करताना 2705 धावा केल्या, त्याशिवाय त्याने 2 विकेट देखील घेतल्या. ज्यामध्ये 3 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. 92 लिस्ट ए मॅचेसमध्ये फलंदाजी करताना त्याने 1400 धावा केल्या.
हेही वाचा:
Smriti Mandhana ने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटर..!