ENG vs NZ: सध्या जागतिक क्रिकेट मध्ये इंग्लंड आणि न्युझीलंड (ENG vs NZ) यांच्यात WTC शृंखलेतून कसोटी सामने खेळवले जात आहेत. या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने सोमवारी इंग्लंडविरुद्ध नवा इतिहास रचला आहे, जिथे त्याने हॅमिल्टनमध्ये दमदार शतक झळकावून आपली शक्ती दाखवून दिली.
HISTORY BY KANE WILLIAMSON. 🙇♂️
– Williamson becomes the first batter in history to score 5 consecutive Test centuries at a single venue. 🤯 pic.twitter.com/8KF4k242BZ
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 16, 2024
ENG vs NZ: केन विल्यमसन ठरला एकाच मैदानावर सलग 5 शतके ठोकणारा एकमेव खेळाडू.
या सामन्यात शतक पूर्ण करून, विल्यमसन कसोटी क्रिकेटच्या 147 वर्षांच्या इतिहासात एकाच मैदानावर सलग पाच सामन्यांमध्ये शतक ठोकणारा पहिला क्रिकेटपटू ठरला. हॅमिल्टन येथील सेडॉन पार्कमध्ये त्याने ही कामगिरी केली. हा किवी फलंदाज तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात १५६ धावांवर बाद झाला.
अशाप्रकारे पाहिल्यावर हॅमिल्टनचे सेडन पार्क विल्यमसनसाठी शुभ ठरले आहे. या सामन्यापूर्वी त्याने या मैदानावर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध 200 धावा, 2019 मध्ये इंग्लंडविरुद्ध 104 धावा, 2020 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 251 धावा आणि यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 133* धावा केल्या होत्या.
हेही वाचा: