Mitchell Marsh Catch: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना 14 डिसेंबरपासून ब्रिस्बेन येथे खेळवला जात आहे. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ वेळेआधीच थांबवण्यात आला. तिसऱ्या दिवशीही पावसाने सामन्यात व्यत्यय आणला मात्र यादरम्यान तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रोलीयाचा दिग्गज खेळाडू मिचेल मार्शने ( Mitchell Marsh ) सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) चा अप्रतिम झेल घेतला. हवेत उडी मारताना मार्शने गिलचा झेल पकडला, त्यानंतर गिल मार्शच्या चेहऱ्याकडे पाहत राहिला त्याचा हा व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे..
Mitchell Marsh Catch: मिचेल मार्शने घेतला शानदार झेल, व्हायरल व्हिडीओ पहाच..
यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर शुभमन गिल फलंदाजीसाठी क्रीझवर आला. या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण गिल मिचेल स्टार्कचा बळी ठरला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर स्टार्कने त्याला आपला बळी बनवले. त्याने गिलला आऊट स्विंग बॉलवर ड्राईव्ह मारण्यास भाग पाडले. गिलच्या बॅटची कड घेत चेंडू हवेत गेला. मिशेल मार्शने हवेत काही फूट उडत एक दमदार झेल घेतला, त्यानंतर सोशल मीडियावर मार्शच्या झेलचे कौतुक होऊ लागले. आता मार्शचा हा झेल सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला आहे.
2016 🤝 2024.
– Mitchell Marsh, the flying Bison!! 🦬 pic.twitter.com/MIAfE6SNol
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) December 16, 2024
IND vs AUS तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी!
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 117.1 षटके फलंदाजी केली आणि 445/10 धावांची मोठी धावसंख्या उभारली. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी शतकी खेळी केली, तर ॲलेक्स कॅरीने 70 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच भारतीय आघाडीचे फलंदाजही चमकदार कामगिरी करून संघासाठी मोठी खेळी खेळतील, असा विश्वास होता. पण असे झाले नाही.
संघाच्या जवळपास आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. जैस्वाल 4 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर शुभमन गिल 3 चेंडूत 1 धावा करून बाद झाला. याशिवाय विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनीही निराशा केली. पावसामुळे भारतीय संघ तिसऱ्या दिवशी केवळ 17 षटकेच फलंदाजी करू शकला. रोहित शर्मा आणि केएल राहुल क्रीजवर नाबाद आहेत. चौथ्या दिवशी हिटमॅन आणि राहुलकडून मोठ्या अपेक्षा असणार आहेत.
हेही वाचा: