Ravichandran Ashwin Retirement: भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटी संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्येच नाही तर क्रिकेट तज्ज्ञांमध्येही त्याने अचानक असा निर्णय का घेतला याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
Ravichandran Ashwin announces his retirement
from all forms of cricket.#Ashwin #DSPSiraj #indvsausTestseries #BCCI #FreenBecky #IndianCricketTeam #Test #WWENXT📷 #Cricket pic.twitter.com/BrY6UbzYvo— sports wordz (@SportsWord24) December 18, 2024
अश्विनने का जाहीर केली निवृत्ती? (Ravichandran Ashwin Retirement)
अश्विनला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पर्थ कसोटीत खेळायचे होते, पण संघाने त्याच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली, असा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही सांगितले की, मी त्याच्याशी त्याच्या निर्णयाबद्दल बोललो, जिथे अश्विनने स्पष्टपणे सांगितले की, मालिकेत त्याची गरज नसेल तर त्याने खेळाला अलविदा म्हटले तर बरे होईल.
अश्विन च्या या निर्णयाने एका दिग्गज खेळाडूची कारकीर्द संपली आहे. अश्विनने आपल्या कारकिर्दीमध्ये तब्बल 6 कसोटी शतके झळकावली आहेत.
हेही वाचा: