मोठी बातमी..! ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्धची T-20 मालिका केली रद्द, समोर आले धक्कादायक कारण..

मोठी बातमी..! ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्धची T-20 मालिका केली रद्द, समोर आले धक्कादायक कारण..

AUS vs AFG:  ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान (AUS vs AFG)  यांच्यात ऑगस्ट महिन्यामध्ये द्विपक्षीय मालिका होणार होती. मात्र ऑस्ट्रेलियाने ही मालिका खेळण्यासाठी साफ नकार दिला आहे. त्यामुळे अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने यावर नाराजी व्यक्त केली आहे. तालिबानचे कारण पुढे करत ऑस्ट्रेलियाने ही मालिका खेळण्यास नकार दिला आहे.

यापूर्वी देखील ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान बरोबर घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळण्यास नकार दिला होता. यासोबतच एक वन डे मालिका देखील ऑस्ट्रेलियाने रद्द केली होती. मात्र हे दोन्ही संघ 2022 टी विश्वचषक व भारतात झालेल्या 2023 विश्वचषक स्पर्धेत आमने सामने आले होते.

AUS vs AFG: ऑस्ट्रेलिया ने अफगानिस्तान के खिलाफ टी20 श्रृंखला स्थगित की,  महिलाओं की खराब स्थिति का दिया हवाला | LatestLY हिन्दी

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की,

ऑस्ट्रेलिया सरकारने अफगाणिस्तानी महिलांना दिलेल्या चुकीच्या वागणुकीमुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांमध्ये क्रिकेट क्रिकेट सामन्यांच्या मालिकेचे कोणतेच नियोजन नव्हते. भविष्यामध्ये दोन्ही संघांमध्ये मालिका लवकरच खेळवण्यात येईल.

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्धची मालिका ही पुढे ढकलली असली तरी, ती पुन्हा कधी खेळवण्यात येणार आहे, याबाबत सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. 2021 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने अफगाणिस्तान विरुद्ध पहिल्यांदा मालिका खेळण्यास नकार दिला होता. तालिबानने महिलांना खेळामध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध घातला होता. तालिबानच्या या चुकीच्या वागणुकीमुळे ऑस्ट्रेलियाने विरोध दर्शवला आहे.

मोठी बातमी..! ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्धची T-20 मालिका केली रद्द, समोर आले धक्कादायक कारण..

ऑस्ट्रेलियाने नोव्हेंबर 2021 मध्ये अफगाणिस्तान विरुद्ध होबार्ट येथे आयोजित केलेला कसोटी सामना देखील रद्द केला होता. त्यानंतर 2023 मध्ये यूएई मध्ये होणारी तीन एक दिवसीय सामन्यांची मालिका देखील रद्द केली होती. आता पुढे या दोन्ही देशामध्ये मालिका होणार का नाही? हे पाहणे रंजक ठरणार आहे.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.