ट्रॉफी जिंकल्यानंतर स्मृती मानधनाच्या गळ्यात हात टाकून सोबत फोटो काढणारा तरूण कोण? सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल..

0
25
ट्रॉफी जिंकल्यानंतर स्मृती मंधनाच्या गळ्यात हात टाकून सोबत फोटो काढणारा तरूण कोण? सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल..
ad

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

महिला प्रीमियर लीग 2024 (WPL 2024) मध्ये आरसीबीसाठी विजेतेपद पटकावणारी कर्णधार स्मृती मानधना हिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.  हा फोटो  WPL 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर घेतलेले आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती स्मृती मानधना ट्रॉफीसोबत दिसत आहे. ज्यानंतर आता सोशल मीडियावर चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे की स्मृती मानधनासोबत दिसणारी ही व्यक्ती कोण आहे? याबाबत चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

खरं तर, महिला प्रीमियर लीग 2024 च्या अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करून आरसीबीने प्रथमच विजेतेपदावर कब्जा केला. यानंतर सोशल मीडियावर आरसीबीच्या खेळाडूंचे अनेक फोटो समोर आले आहेत. त्यापैकी संघाची कर्णधार स्मृती मानधना हिच्या छायाचित्राने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. ज्यामध्ये एक व्यक्ती स्मृतीला मिठी मारताना दिसली होती. आता सोशल मीडियावर काही चाहते ही व्यक्ती स्मृतीचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगत आहेत. तर तो व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड ‘पलाश मुच्छाल‘आहे.

नक्की कोण आहे पलाश मुच्छाल ?

पलाश मुच्छाल हा बॉलीवूड गायक पलक मुच्छालचा भाऊ असून तो संगीतकार देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2023 मध्ये एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान पलाशने स्मृती यांना एक गाणे समर्पित करून आपले प्रेम व्यक्त केले होते. त्यानंतर दोघांची नावे अनेकदा एकमेकांशी जोडली जातात. पलाश आणि स्मृती यांचे फोटो सोशल मीडियावर यापूर्वीच समोर आले आहेत. मात्र, आजपर्यंत दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितलेले नाही.

ट्रॉफी जिंकल्यानंतर स्मृती मंधनाच्या गळ्यात हात टाकून सोबत फोटो काढणारा तरूण कोण? सोशल मिडीयावर फोटो होतायेत तुफान व्हायरल..

स्मृती मंधानाने तिच्या नेतृत्वाखाली RCB ला दुसऱ्या सत्रात WPL चे चॅम्पियन बनवले. RCB गेल्या 16 वर्षांपासून आयपीएलमध्ये जे करू शकले नाही, ते आरसीबी महिला संघाने दोन वर्षांत डब्ल्यूपीएलमध्ये केले आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला.


==

आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.