Australia v New Zealand: कांगारू खेळाडूंनी पडला धावांचा पाऊस: विश्वचषकात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला संघ

विश्वचषक 2023 मधील 27 वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीस अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी अक्षरशः धावांचा पाऊस पडला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीचे फलंदाज डेविड वॉर्नर आणि दुखापती मधून पुनरागमन करणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याने पहिल्या पावर प्ले मध्ये चौकार षटकारांची आतिश बाजी केली.

 

डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी पॉवर प्ले मध्ये ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 118 वर पोहोचवली. वर्ल्ड कपच्या इतिहासामधील पॉवर प्ले मधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असे झाले आहे की कोणत्या सलामीच्या जोडीने पहिल्या दहा मोठी धावसंख्या रचली आहे. यासह या सलामीच्या जोडीने पॉवर प्ले मध्ये दहा षटकार ठोकले आहेत. यापूर्वी याच विश्वचषकात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिके विरुद्ध खेळताना दहा षटकार ठोकले होते.

 

वर्ल्ड कपमध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा संघ

ऑस्ट्रेलिया – 10 षटकार – विरुद्ध न्यूझीलंड

श्रीलंका – 9 षटकार – विरुद्ध दक्षिण आफ्रिका

न्यूझीलंड – 7 षटकार – विरुद्ध इंग्लंड

वेस्ट इंडिज – 7 षटकार – विरुद्ध न्यूझीलंड

वेस्ट इंडिज – 7 षटकार – विरुद्ध कॅनडा

 

वेगवान अर्धशतक ठोकले

ट्रॅव्हिस हेडने या विश्वचषकात पहिल्यांदा खेळताना 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासह ट्रॅव्हिस हेड हा विश्वचषकाच्या इतिहासामध्ये सर्वात वेगाने अर्धशतक ठोकणाऱ्या फलंदाजाच्या यादीत श्रीलंकेच्या कुसल मेंडीस बरोबर टॉप वर आहे. याच विश्वचषक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नरने याने 28 चेंडूत शतक पूर्ण केले आहे. डेव्हिड वॉर्नरने 65 चेंडू 81 धावांची धमाकेदार खेळी केली आहे. तर ट्रॅव्हिस हेड याने 67 चेंडूत 109 धावांची विस्फोटक खेळी केली.

ट्रॅव्हिस हेड आणि डेव्हिड वॉर्नर या सलामीच्या जोडीने संघाला धमाकेदार सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी 175 धावांची भागीदारी केली, याच्या जोरावर कांगारू संघाला 388 धावांपर्यंत मजल मारता आली.