ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार ‘शाकिब अल हसन’कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?

ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार 'शाकिब अल हसन'कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?

ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार ‘शाकिब अल हसन’कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?


ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार ‘शाकिब अल हसन’कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?ban vs afg: विश्वचषक २०२३ (World Cup 2023) मध्ये बांगलादेश आणि अफगाणिस्तान (ban vs afg) यांच्यात सामना सुरू असताना सर्वांच्या नजरा शकिब अल हसनवर असतील. कारण या सामन्यात या बांगलादेशी कर्णधाराने 41 धावा केल्या तर, तो विश्वचषक इतिहासातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू बनेल. सध्या, शकीब अल हसनचा समावेश 8 अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत आहे ज्यांनी वर्ल्ड कपमध्ये 1000+ धावा केल्या आहेत आणि 10+ विकेट्स घेतल्या आहेत. येथे तो चौथ्या क्रमांकावर आहे. या 8 अष्टपैलू खेळाडूंमध्ये शाकिबच्या (shakib al hasan) नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. त्याने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 34 विकेट्स घेतल्या आहेत. धावांच्या बाबतीत तो या अष्टपैलू खेळाडूंमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 1146 धावा आहेत. तो या यादीत अव्वल स्थानावर असलेल्या ख्रिस गेलपेक्षा फक्त 40 धावांनी मागे आहे.

AFG vs BAN

शाकिब ल हसनची विश्वचषक कारकीर्द

शाकिब अल हसनने (shakib al hasan) 2007 साली विश्वचषकात पदार्पण केले. यावेळेस तो १४ वा विश्वचषक खेळत आहे. आत्तापर्यंत शाकिबने चार विश्वचषकांमध्ये एकूण 29 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये शाकिबने 45.84 च्या फलंदाजीच्या सरासरीने 1146 धावा केल्या आहेत. विश्वचषकातही त्याने दोन शतके झळकावली आहेत. शाकिबने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत 600 हून अधिक धावा केल्या होत्या. त्याचबरोबर गोलंदाजीच्या बाबतीतही शाकिब खूप प्रभावी ठरला आहे. त्याने विश्वचषकात 35.94 च्या गोलंदाजीच्या सरासरीने 34 बळी घेतले आहेत.

विश्वचषकात 1000+ धावा आणि 10+ विकेट घेणारे अष्टपैलू खेळाडू

ban vs afg: आज बांग्लादेशचा कर्णधार 'शाकिब अल हसन'कडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी, विश्वचषकातील आजवरचा सर्वोत्तम अष्टपैलू होणार?