Viral Video: बेन स्टोक्सने मारला एवढा जबरदस्त षटकार की,थेट खुर्चीच मोडली; कॅमेरामॅनही थोडक्यात वाचला,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0

Ben Stocks broken Chair by hitting six:  भारतात सुरु असलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेत सध्या वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळत आहेत. काल (4 नोव्हेंबर)  विश्वविजेता इंग्लंड संघ वनडे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातही इंग्लंडचा पराभव झाला. सातव्या सामन्यातील त्याचा हा सहावा पराभव ठरला. मात्र, या सामन्यादरम्यान एक रंजक दृश्य पाहायला मिळाले. इंग्लिश फलंदाज बेन स्टोक्सने षटकार मारून स्टेडियममध्ये ठेवलेली खुर्ची तोडली,त्याचा हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.

Viral Video: बेन स्टोक्सने मारला एवढा जबरदस्त षटकार की,थेट खुर्चीच मोडली; केमेरामेनही थोडक्यात वाचला,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

हे दृश्य इंग्लंड फलंदाजी करत असतांना 32 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दिसले. ट्रॅव्हिस हेडने चेंडू टाकताच स्टोक्सने शॉर्ट बॉलवर मागे जाऊन लेग साइडला षटकार मारला. हा षटकार इतका सपाट होता की, तो सीमेपलीकडे ठेवलेल्या खुर्चीवर आदळला. चेंडू खुर्चीच्या मधोमध आदळताच खुर्ची तुटली गेली. या षटकाराने कॅमेरामन थोडक्यात बचावला.  याचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होऊ लागला. जो तो बेन स्टोक्सच्या षटकाराबद्दल बोलायला लागला आहे.

पहा व्हिडीओ,

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

बेन स्टोक्सने 3 षटकार ठोकले, मात्र संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही..

बेन स्टोक्स 90 चेंडूत 64 धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार मारले. त्याने आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तर डेव्हिड मलानने 50, मोईन अलीने 42 आणि ख्रिस वोक्सने 32 धावा केल्या.

मात्र, 287 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 253 धावांत गडगडला. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना 33 धावांनी जिंकला. या पराभवानंतर इंग्लंड उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे. गुणतालिकेत ते 7 पैकी 6 सामने गमावल्यानंतर 2 गुणांसह 10 व्या स्थानावर आहे. त्याचे पुढील दोन सामने नेदरलँड्स आणि पाकिस्तानशी होतील. मात्र, इंग्लंडच्या दृष्टिकोनातून ही केवळ औपचारिकता असेल. हे सामने जिंकून शेवट गोड करायचं एवढच बाकी आहे..


हेही वाचा:

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत

Leave A Reply

Your email address will not be published.