Boxing Day Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा सामना मेलबर्न येथे खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नॅथन मॅकस्विनीच्या जागी सलामीचा फलंदाज म्हणून सॅम कॉन्स्टासचा (Sam Konstan) समावेश केला आहे. त्याने उस्मान ख्वाजाच्या साथीने डावाची सलामी दिली. सॅम कॉन्स्टासने पदार्पणाच्या सामन्यात शानदार फलंदाजी करत इतिहास रचला आहे.
Boxing Day Test: सॅमने रचला खास विक्रम..!
सामन्याच्या सुरुवातीपासूनच सॅम अप्रतिम फॉर्ममध्ये दिसत होता. हा त्याचा पदार्पणाचा सामना असून पहिल्याच सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजीचे प्रदर्शन केले. सॅमनेही पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले आहे.
याशिवाय या युवा खेळाडूने टीम इंडियाचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहविरुद्धही अप्रतिम फटके मारले आहेत. आता सॅम कॉन्स्टास कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात बुमराहविरुद्ध 2 षटकार मारणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी, 2018 मध्ये इंग्लंडच्या जोस बटलरने ही कामगिरी केली होती.
Boxing Day Test: पहिल्याच दिवशी सॅमने 60 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली
या सामन्यात सॅमने पहिल्याच चेंडूपासून भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकण्यास सुरुवात केली. सॅमने वेगवान गोलंदाजांविरुद्ध अनेक अप्रतिम फटके मारले. मात्र, फिरकीच्या विरोधात त्याला थोडा त्रास झाला. पहिल्या दिवशी 65 चेंडूत 60 धावा करून सॅम बाद झाला. या खेळीत सॅमने 6 चौकार आणि 2 षटकार मारले. रवींद्र जडेजाने सॅमला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.