Boxing Day Test Live: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथी आणि बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) मेलबर्न (Melbarn) येथे खेळवली जात आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे.
Boxing Day Test Live: भारतीय प्लेईंग 11 मध्ये मोठा बदल !
मेलबर्न कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. युवा सलामीवीर शुभमन गिलला या कसोटीसाठी संघात संधी मिळाली नाहीये. गिलला संघातून बाहेर काढल्यामुळे चाहते आच्छर्यचकित झाले आहेत. या मालिकेत गिलची आतापर्यंतची कामगिरी काही विशेष झाली नाही. आता गिलच्या बॉक्सिंग डे कसोटीतून बाहेर राहण्यामागचे कारणही समोर येत आहे.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी शुभमन गिलला (Shubhman Gill) टीम इंडियातून वगळण्यात आले आहे. कर्णधार रोहित शर्माने गिलच्या जागी स्वत:ला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले असून त्यात वॉशिंग्टन सुंदरचा समावेश केला आहे. 2020 पासून गिलची भारताबाहेर कामगिरी काही विशेष राहिलेली नाही. भारताबाहेरील मैदानावर शुभमन गिलची सरासरी केवळ 28.5आहे.
IND vs AUS मालिकेत ही शुभमन गिल अपयशी.
Shubman gill in Australia in 2020-2021 tour – 52 average
– he missed Perth test due to injury
– he was India’s best batter in adelaide test in both innings
– just 1 innings failure at Gabba so he will be dropped in the conditions of Australia where he has succeeded pic.twitter.com/ZUKjoLhS6s
— 𝘿𝙖𝙠𝙨𝙝 (@screwgauge77) December 25, 2024
सध्या सुरु असलेल्या IND vs AUS मालिकेतही शुभमन गिलची कामगिरी काही खास नव्हती. गिल पहिली पर्थ कसोटी खेळू शकला नाही. यानंतर, त्याने ॲडलेड कसोटीत पुनरागमन केले, ज्यामध्ये गिलने पहिल्या डावात 31 धावा आणि दुसऱ्या डावात 28 धावा केल्या.
याशिवाय गब्बा कसोटीच्या एका डावात त्याच्या बॅटमधून केवळ 1 धावा काढल्या होत्या. आता टीम इंडिया मेलबर्न कसोटीत 2 फिरकी गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूंसह दाखल झाली आहे, त्यामुळे गिलला बाहेर राहावे लागले आहे.
सामन्यापूर्वी नितीश कुमार रेड्डी यांना बॉक्सिंग डे कसोटीतून बाहेर ठेवले जाऊ शकते, अशा बातम्या येत होत्या. कारण टीम इंडियाला 2 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरायचे होते, मात्र नितीशला मेलबर्न कसोटीसाठी संघात ठेवण्यात आले आहे. आत्तापर्यंत या मालिकेत नितीशची कामगिरीही बऱ्यापैकी झाली आहे.
मेलबर्न कसोटीसाठी टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन (Team India playing 11 for 4th test)
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
हेही वाचा: