ENG vs NZ: इंग्लंड हा क्रिकेटचा जन्मदाता देश म्हणून ओळखला जातो. क्रिकेटला जेन्टलमन खेळ म्हणून ओळखल जाते ते इंग्लंडमुळेच आणि याच इग्लंड संघाने आज क्रिकेटच्या इतिहासातील सर्वांत मोठा टप्पा पार करत एक ऐतिहासिक विक्रम आपल्या नावे नोंदवला आहे. सध्या सुरु असलेल्या इंग्लंड आणि न्यूझीलंड ( ENG vs NZ) यांच्यातील कसोटी सामन्यात हा विक्रम झाला आहे.
तुम्हाला माहीत आहे का कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा (Most Runs in test Cricket) संघ कोण आहे?
अलीकडेच, इंग्लंडने क्रिकेटच्या इतिहासात असा पराक्रम केला की, आजपर्यंत इतर कोणताही संघ करू शकला नाही. कसोटी सामन्यात विक्रमी धावसंख्या करत इंग्लंडने नवा इतिहास रचला आहे.
हे यश संघाच्या मेहनतीचे, संयमाचे आणि उत्कृष्ट खेळाचे फळ आहे. इंग्लंडच्या या कामगिरीने संपूर्ण क्रिकेट जगताला धक्का बसला आहे. या विक्रमामुळे कसोटी क्रिकेटमध्ये सांघिक काम आणि संयमाने काहीही शक्य आहे हे सिद्ध होते.
ENG vs NZ: इंग्लंडचा ऐतिहासिक रेकॉर्ड काय आहे?
इंग्लंड क्रिकेट संघाने कसोटी क्रिकेटमध्ये मोठा इतिहास रचला असून 5 लाखांहून अधिक धावा करणारा जगातील पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान हा विक्रम प्रस्थापित केला.
इंग्लंडने आतापर्यंत 1082 कसोटी सामने खेळले असून एकूण 500,000 हून अधिक धावा केल्या आहेत. या यादीत ऑस्ट्रेलिया दुस-या स्थानावर आहे, ज्याने 4,28,794 धावा केल्या आहेततर एकूण 2,78,700 हून अधिक धावा घेऊन भारत तिसऱ्या स्थानावर आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रमही इंग्लंडच्या नावावर आहे, ज्यामध्ये त्यांच्या फलंदाजांनी 929 शतके झळकावली आहेत.
500,000 reasons to love England ❤️ pic.twitter.com/yvm1wRogeE
— England Cricket (@englandcricket) December 7, 2024
ENG vs NZ: न्यूझीलंड दौऱ्यावर इंग्लंडची शानदार कामगिरी!
न्यूझीलंड दौऱ्यावर इंग्लंड संघाने चमकदार कामगिरी करत पहिल्या कसोटीत यजमान संघाचा 8 विकेट्सने पराभव केला. दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडचा दबदबा दिसून आला. पहिल्या डावात 280 धावांत सर्वबाद झाल्यानंतर इंग्लंडने शानदार पुनरागमन करत न्यूझीलंडचा डाव अवघ्या 125 धावांत गुंडाळला.
यानंतर बेन डकेट, जेकब बेथेल, जो रूट आणि हॅरी ब्रूक यांनी अर्धशतकांच्या बळावर संघाला मजबूत स्थितीत आणले. मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतल्याने इंग्लंडने कसोटी क्रिकेटमधला ते एक शक्तिशाली संघ असल्याचे सिद्ध केले. मात्र, डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर असूनही त्याची कामगिरी वाखाणण्याजोगी होती.
ENG vs NZ:WTC फायनलच्या शर्यतीत इंग्लंड पिछाडीवर!
इंग्लंडने न्यूझीलंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली असली तरी ,डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत(WTC Final 2024-25) पोहोचण्याची त्यांची शक्यता जवळपास संपुष्टात आली आहे. संघाने डब्ल्यूटीसीमध्ये खेळल्या गेलेल्या 20 कसोटी सामन्यांपैकी 10 जिंकले आणि 9 गमावले, ज्यामुळे ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.
दुसरीकडे, भारत आणि ऑस्ट्रेलियासारखे संघ अंतिम फेरीच्या शर्यतीत प्रबळ दावेदार आहेत. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेलाही कामगिरी सुधारून अंतिम फेरी गाठण्याची संधी आहे. डब्ल्यूटीसीच्या शर्यतीत संघ जरी पिछाडीवर असला तरी, आपल्या खेळाने नवा इतिहास नक्कीच रचला असल्याचे इंग्लंडच्या या कामगिरीवरून दिसून येते.
हेही वाचा:
IND vs AUS: जसप्रीत बूमराहने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज..!