IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (Border Gawaskar Trophy) अंतर्गत, पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान कांगारू संघाला भारताकडून दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आता त्या पराभवाचा बदला घेण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने ॲडलेड कसोटीत भारतीय संघासाठी सापळा रचला आहे.
IND vs AUS: दुसऱ्या कसोटीसाठी ॲडलेडची खेळपट्टी ग्रीन टॉप बनवली जात आहे.
पर्थ कसोटी सामन्यात 295 धावांच्या मोठ्या फरकाने पराभूत झाल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी ॲडलेडच्या खेळपट्टीला हिरवेगार बनवले आहे. ॲडलेडमध्ये 6 डिसेंबर रोजी होणाऱ्या दिवस-रात्र कसोटी (IND vs AUS Day-Night Test) सामन्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खेळपट्टीचे काही फोटो आता समोर आले आहेत. आणि त्यात ही खेळपट्टी अतिशय हिरवीगार दिसत असल्याचे या चित्रात स्पष्टपणे दिसून येते.
IND vs AUS: भारताला कोंडीत पकडण्यासाठी खेळपट्टी तयार केली जात ?
ऑस्ट्रेलियासाठी तयार करण्यात आलेल्या या खेळपट्टीवर भरपूर पाणी ओतले जात असून ती हिरवीगार ठेवण्यास सांगण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना स्विंग आणि बाऊन्स मिळणार असून कांगारू संघ या चालीसह टीम इंडियाला अडकवण्याच्या तयारीत आहे.
IND vs AUS: पिंक बॉल कसोटीमध्ये आजपर्यंत एकदाही पराभूत नाही झाला ऑस्ट्रोलिया.
केवळ ही खेळपट्टीच नाही तर ,आणखी एक गोष्ट भारतासाठी भीतीदायक आहे. ती म्हणजे गुलाबी चेंडू कसोटीत (Pink Ball test) ऑस्ट्रेलियन संघाची कामगिरी अत्यंत धोकादायक आहे, जिथे त्यांनी आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे 6 तारखेपासून होणाऱ्या या पिंक बॉल कसोटी कडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे..