IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रोलिया यांच्यातील बोर्डर गावस्कर ट्रॉफीचा 4 था कसोटी सामना (Boxing Day Test) आजपासून मेलबर्न मैदानावर खेळवला जात आहे. या मेलबर्न कसोटीचा पहिला दिवस संपताच आयसीसीने अनुभवी फलंदाज विराट कोहलीला मोठा दंड ठोठावला आहे.
IND vs AUS: आयसीसीने विराट कोहलीला दंड का ठोठावला?
खरंतर विराटने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर सॅम कॉन्स्टाससोबत एक कृत्य केले होते ज्यावर कारवाई म्हणून आयसीसीने हा निर्णय दिला आहे. नक्की काय आहे प्रकरण जाणून घेऊया सविस्तर..
या घटनेनंतर आयसीसीने विराटच्या मॅच फीच्या 20 टक्के कपात केली असून तो लेव्हल 1साठी दोषी आढळला आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर विराटनेही आपली चूक मान्य केली आहे, त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणीची गरज भासणार नाही.
IND vs AUS: दहाव्या षटकात घडली नाट्यमय घटना.
ऑस्ट्रेलियन डावाच्या 10व्या आणि 11व्या षटकांच्या ब्रेक दरम्यान, जेव्हा कॉन्स्टास आणि उस्मान ख्वाजा शेवट बदलत होते, तेव्हा कोहली कॉन्स्टासकडे गेला आणि त्याच्या खांद्यावर खांदा आपटला.
त्यावेळी समालोचन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगचाही विश्वास होता की कोहलीने हे जाणूनबुजून केले आहे. दुसरीकडे माजी भारतीय खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराटच्या या कृतीला पूर्णपणे अनावश्यक म्हटले आहे.
Boxing Day Test Live: शुभमन गिलला का नाही मिळाली बॉक्सिंग डे कसोटीसाठी संधी? समोर आले मोठे कारण..!
IND vs AUS: विराट पहिल्या स्तरावर दोषी आढळला.
Crick Wordz च्या बातमीनुसार, विराट लेव्हल वनमध्ये दोषी आढळला आहे आणि त्यामुळे त्याची मॅच फी कापण्यात आली आहे. हा लेव्हल टू गुन्हा असता तर भारतीय फलंदाजाला तीन किंवा चार डिमेरिट गुण मिळाले असते. पुढील सामन्यासाठी खेळाडूला निलंबित करण्यासाठी चार गुण पुरेसे आहेत. यावरून विराट सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या सामन्यात खेळताना दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
IND vs AUS:घटनेवर कॉन्स्टस काय म्हणाला?
या घटनेनंतर कांगारूंचा सलामीवीर कॉन्स्टासने सकाळच्या सत्रात ड्रिंक्स ब्रेक दरम्यान याबद्दल सांगितले की, त्याला ही घटना मैदानाच्या आत ठेवायला आवडेल, परंतु भारतीय संघाविरुद्ध कठीण स्पर्धा देण्यास त्याचा कोणताही आक्षेप नाही.
Everything against Australia is fair. Virat did nothing wrong. #INDvsAUS #ViratKohli𓃵 pic.twitter.com/fpyCLDfYgs
— NAYAN (@nayan_njk) December 26, 2024
कॉन्स्टास म्हणाला,
‘मैदानावर काहीही झाले तरी मैदानावरच राहते. मला स्पर्धा करायला आवडते आणि प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियमपेक्षा पदार्पण करण्यासाठी आणखी चांगली जागा असू शकत नाही. त्यामुळे जे झाले त्याला मी फार असे महत्व देत नाही.
हेही वाचा: