IND vs AUS: ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी जसप्रीत बुमराहने विशेष कामगिरी केली. उस्मान ख्वाजाला बाद करून बुमराहने केवळ भारताला सुरुवातीचे यश मिळवून दिले. या विकेट्ससह त्याने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
IND vs AUS: जसप्रीत बूमरह ठरला 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उस्मान ख्वाजाला बाद करताच जसप्रीत बूमराह 2024 मध्ये 50 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे. तो या वर्षात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाजही ठरला आहे. विकेट्सचे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी त्याने केवळ 11 सामने खेळले आहेत.
बुमराहनंतर या यादीत रविचंद्रन अश्विन (४६ विकेट), इंग्लंडचा शोएब बशीर (४५ विकेट), रवींद्र जडेजा (४४ विकेट) यांचा समावेश आहे.
And in Worldcup ~ Hashim Amla 🔥#INDvsAUS pic.twitter.com/FlsifRLnpS
— 𝑺𝒉𝒆𝒃𝒂𝒔 (@Shebas_10dulkar) December 6, 2024
IND vs AUS: पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांची निराशाजनक कामगिरी!
मात्र, भारतीय फलंदाजांची कामगिरी पहिल्या दिवशी अत्यंत निराशाजनक ठरली. डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने भारताला 44.1 षटकात केवळ 180 धावांवर रोखले. स्टार्कने 6-48 अशी प्रभावी आकडेवारी नोंदवली, जी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 15वी पाच बळी आहे.
IND vs AUS: भारताकडून नितेश रेड्डीने काढल्या सर्वाधिक धावा.
भारताकडून नितीश रेड्डीने 42, केएल राहुलने 37 आणि शुभमन गिलने 31 धावा केल्या. राहुल आणि गिलने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावा जोडल्या, पण स्टार्कने शानदार पुनरागमन करत राहुल आणि विराट कोहलीच्या विकेट घेतल्या. बोलंडने गिलला एलबीडब्ल्यू करून रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
नितीश रेड्डीने स्टार्क आणि बोलंड यांच्याविरुद्ध काही शानदार फटके मारले, पण ते भारतीय डाव सावरू शकले नाहीत. मिडऑफमध्ये रेड्डीला बाद करून स्टार्कने भारतीय डाव संपवला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी गोलंदाजीवर वर्चस्व राखत सामन्यावर पकड घट्ट केली.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रोलीयाचा संघ 94 धावांनी मागे होता. आता दुसऱ्या दिवशी कसा खेळ होता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा:
IND vs AUS: दिवसरात्र कसोटीत पहिल्याच दिवशी दोन वेळा ओव्हल स्टेडियमवर गोंधळ, थांबवावा लागला 2 वेळा सामना; पहा व्हायरल व्हिडीओ