IND vs AUS live: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक ठरली आणि अवघ्या 180 धावा करून संपूर्ण संघ बाद झाला.
ला प्रत्युत्तर म्हणून कांगारू संघाने दमदार सुरुवात केली असून नॅथन मॅकस्विनी आणि मार्नस लॅबुशेन ही जोडी भारतीय गोलंदाजांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
टीम इंडियाला पहिल्या दिवशी फक्त एक विकेट मिळाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रोलियाने 1गडी गमावून 86 धावा बोर्डावर लावल्या आहेत.
IND vs AUS live: मोहम्मद सिराज आणि मार्नस लॅबुशेन मध्ये आरेरावी? सिराजने थेट स्टंपवरच मारला चेंडू.
भारतीय संघ गोलंदाजी करत असतांना यावेळी एक मोठी घटना पाहायला मिळाली. ऑस्ट्रोलियाचा फलंदाज मार्नस लॅबुशेन ने सिराज समोर फलंदाजी कताना एक असे कृत्य केले जे पाहून सिराजला राग आला आणि त्याचा राग त्याच्या डोळ्यांत स्पष्ट दिसत होता. मार्नस लॅबुशेनच्या एका कृतीमुळे सिराज इतका संतप्त झाला की त्याने चेंडू विकेटवर फेकून मारला.
IND vs AUS live: सिराज लाबुशेनवर का रागावला ?
मोहम्मद सिराज गोलंदाजीसाठी पूर्णपणे तयार होता आणि त्याने रनिंग सुरू केली मार्नस लॅबुशेन पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होता. चेंडू टाकण्यात तेवढ्यात मात्र, अचानक लॅबुशेनला समोर दृश्य स्क्रीनच्या मागे एक प्रेक्षक दिसला. समोरून क्रिकेटचा चाहता जात असल्याचे पाहून लॅबुशेन ताबडतोब क्रीजपासून दूर गेला आणि स्क्रीनकडे बोट दाखवला.
मात्र, जवळपास धावपळ पूर्ण केल्यानंतर गोलंदाजी करायला निघालेल्या सिराजला लॅबुशेनने क्रीझवरून अचानक माघार घेणे पसंत केले नाही. भारताचा वेगवान गोलंदाज लॅबुशेनला या कृतीचा राग आला आणि त्याने चेंडू थेट स्टंपवर मारला. यासोबतच सिराज चांगलाच संतापला आणि लॅबुशेनला काहीतरी बोलताना दिसला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पहा व्हायरल व्हिडीओ.
• Man runs behind the sight screen with a beer snake
• Marnus pulls away while Siraj is running in
• Siraj is not happyAll happening at Adelaide Oval 🫣 #AUSvIND pic.twitter.com/gRburjYhHg
— 7Cricket (@7Cricket) December 6, 2024
IND vs AUS live :ऑस्ट्रोलियाचे दमदार प्रदर्शन, पहिला दिवस केला स्वतःच्या नावावर..
पहिल्या डावात टीम इंडियाला 180 धावांत गुंडाळल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली. पहिल्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत कांगारू संघाने केवळ एक विकेट गमावून स्कोअर बोर्डवर 86 धावा केल्या होत्या. भारतीय संघाप्रमानेच ऑस्ट्रोलिया संघाची सुरुवात देखील चांगली झाली नव्हती अवघ्या 13 धावा करून सलामीवीर उस्मान ख्वाजा जसप्रीत बुमराहचा बळी ठरला.
ख्वाजाने बुमराहच्या आउटगोइंग चेंडूला त्याच्या बॅटने मारले आणि कर्णधार रोहितने स्लिपमध्ये कोणतीही चूक केली नाही आणि भारतीय संघाला पहिला विकेट मिळाला मात्र यानंतर ऑस्ट्रोलियाच्या फलंदाजांनी चांगले कमबक केले आहे.. नॅथन मॅकस्वीनी आणि मार्नस लॅबुशेन क्रीजवर आहेत. मॅकस्विनी 38 धावांवर नाबाद आहे, तर लॅबुशेन त्याला 20 धावांवर साथ देत आहे.
Siraj bowled the fastest delivery in cricket 🤯 pic.twitter.com/SRN1lOJ4V5
— mufaddla parody (@mufaddl_parody) December 6, 2024
पहिल्या डावात भारतीय संघाची फलंदाजी पुन्हा एकदा खराब झाली. संघाची सुरुवात खूपच खराब झाली आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाली. यानंतर केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी केली.
राहुल 37 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तेव्हा गिललाही चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवता आला नाही आणि तो 31 धावा करून बाद झाला. विराट कोहलीला केवळ 7 धावा करता आल्या, तर पंतने 21 धावा केल्या.
कर्णधार रोहितला सहाव्या क्रमांकाचे स्थान आवडले नाही आणि तो केवळ 3 धावा करू शकला. मिचेल स्टार्कनेभारतीय संघाला एकहाती डॉमिनेट करत 6 विकेट्स मिळवल्या. सध्या ऑस्ट्रोलिया 94 धावांनी पिछाडीवर आहे.
हेही वाचा:
IND vs AUS: दिवसरात्र कसोटीत पहिल्याच दिवशी दोन वेळा ओव्हल स्टेडियमवर गोंधळ, थांबवावा लागला 2 वेळा सामना; पहा व्हायरल व्हिडीओ