IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळली जाणारी चौथी कसोटी (IND vs AUS) रंजक वळण घेत असल्याचे दिसते. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत सुरू असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात कांगारूंनी मोठी धावसंख्या उभारली. संघाचा सर्वात शक्तिशाली फलंदाज स्टीव्ह स्मिथने शानदार शतक झळकावले. प्रत्युत्तरात टीम इंडिया पहिल्या डावात फलंदाजी करत आहे.
IND vs AUS: चौथ्या कसोटीमध्ये विराट कोहली सोबत घडली मोठी घटना..
दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या पहिल्या सत्रात मैदानावर एक विचित्र घटना पाहायला मिळाली. सर्व सुरक्षा व्यवस्था झुगारून एक विक्षिप्त प्रेक्षक मैदानात घुसला. एवढेच नाही तर त्याने भारतीय क्रिकेट संघाचा स्टार विराट कोहलीसोबत असे कृत्य केले, ज्याची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे.
IND vs AUS: विराट कोहलीला ती घटना भोवली, आयसीसीने ठोकला मोठा दंड; पहा नेमके काय प्रकरण?
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग-डे कसोटीत भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) आमनेसामने आहेत. पहिल्या दिवसाच्या खेळात अशा अनेक घटना घडल्या, ज्यामुळे क्रिकेट विश्वात बरीच चर्चा झाली. दुसऱ्या दिवशीही हा प्रकार सुरूच होता. दिवसाच्या पहिल्या सत्रात यजमान संघ फलंदाजी करत असताना स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या एका प्रेक्षकाने सुरक्षेचा घेरा तोडून खेळपट्टीत प्रवेश केला.
Boxing Day Test Live: शुभमन गिलला का नाही मिळाली बॉक्सिंग डे कसोटीसाठी संधी? समोर आले मोठे कारण..!
Pitch invader huggs Kohli 😭 pic.twitter.com/RAz81zkfWc
— `rR (@ryandesa_7) December 27, 2024
हा चाहता थेट विराट कोहलीच्या दिशेने गेला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवायला लागला.. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे विराट या गोष्टीने अजिबात अस्वस्थ झाला नाही. मात्र, मैदानावरील सुरक्षा रक्षक तातडीने धावून आले. त्यांनी त्या माणसाला पकडून स्टेडियमच्या बाहेर नेले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
IND vs AUS 4th Test: पहिल्या डावात भारताचा संघर्ष!
सध्या BGT 2024-25 च्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा वरचष्मा आहे. पहिल्या डावात ऑस्ट्रोलिया संघाने 474 धावा ठोकल्या. स्टीव्ह स्मिथने 140 तर कर्णधार पॅट कमिन्सने 49 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात भारताने वृत्त लिहेपर्यंत 2 गडी गमावून 82 धावा केल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 38 धावांवर नाबाद असून विराट कोहली 15 धावांवर नाबाद आहे.
हेही वाचा: