IND Vs AUS Women 2nd ODI: भारतीय महिला संघाला (indian Women Cricket team) ब्रिस्बेन येथे होणाऱ्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाकडून (Australia Women Team) दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
प्रथम गोलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाला 372 धावांचे मोठे लक्ष्य मिळाले होते, ज्याचा पाठलाग करताना भारतीय संघ सुरुवातीलाच गारद झाला. संघाने पहिले 4 विकेट वेगाने गमावले, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारताला सामन्यात पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. आणि महिला भारतीय संघ 249 धावा काढून सर्वबाद झाला.
IND Vs AUS Women 2nd ODI: ऑस्ट्रोलियाच्या महिला संघाने काढल्या 371 धावा.!
ब्रिस्बेन येथे होणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने प्रथम फलंदाजी करताना 371 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. ऑस्ट्रेलियाने 8 विकेट गमावून 371 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी जॉर्जिया वोल आणि एलिस पेरी यांनी शानदार शतके झळकावून संघाला मजबूत स्थितीत आणले. प्रत्युत्तरात भारतीय संघ 249धावांवर ऑलआऊट झाला. यासह 3 एकदिवशीय सामन्याच्या मालिकेत ऑस्ट्रोलीया संघाने 2-0अशी विजयी आघाडी घेतली आहे.
IND vs AUS: ऑस्ट्रोलीयाने पुरुष भारतीय संघाचा देखील केला 10 गडी राखून पराभव.
यापूर्वी भारतीय पुरुष संघालाही यजमान संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर, ऑस्ट्रोलियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि टीम इंडियाचा 10 गडी राखून पराभव केला. एवढेच नाही तर WTC पॉइंट टेबलमध्येही भारताला मोठा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलिया आता पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यासह टीम इंडिया थेट तिसऱ्या स्थानावर घसरली आहे.
वर्ल्ड टेस्ट चेम्पीयनशिप अंतिम सामना (WTC Final) खेळायचा असेल तर आता भारतीय संघाला उर्वरित 3पैकी 3 सामने जिंकणे अत्यावश्यक आहे. परंतु ऑस्ट्रोलिया संघाचा फॉर्म पाहता टीम इंडियाला हे 3 सामने जिंकणे सोपे नसणार आहे,एवढ मात्र नक्की.. Border Gawaskar Trophy मालिकेतील तिसरा कसोटी सामना हा 14 डिसेंबरपासून गाबा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे .