IND vs AUS, World Cup Final: पावसामुळे नाही झाला अंतिम सामना तर कोण होईल विजेता? जाणून घ्या आयसीसीचे नवे नियम..

0

IND vs AUS: ICC विश्वचषक 2023 चा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या विश्वचषकातील दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये हा सामना होणार आहे. देशातच नाही तर जगभरातील चाहत्यांमध्ये या सामन्याची प्रचंड क्रेझ आहे. भारताने या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावल्यास भारत विश्वचषक ट्रॉफीची हॅट्ट्रिक करेल. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने यापूर्वी 5 वेळा एकदिवसीय विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. पावसाचा परिणाम या विश्वचषकावरही दिसून आला आहे. अशा स्थितीत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाऊस पडला, तर विश्वचषक विजेता कोण?

IND vs AUS: सामन्यासाठी राखीव दिवस आहे का?

IND vs AUS FINAL: टीम इंडियाकडे 20 वर्षापूर्वीचा बदला घेण्याची संधी, ऑस्ट्रोलीयासोबत भिडणार अंतिम सामन्यात..!

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्यात जर पाऊस पडला तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. पाऊस पडल्यास हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला खेळवला जाईल. त्याचवेळी दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला तर भारताला विश्वचषक विजेता घोषित केले जाईल. या विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत अव्वल आहे, त्यामुळे पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास भारत विश्वचषक विजेता संघ बनेल. यावरून हे स्पष्ट होते की, निसर्ग भारताला हानी पोहोचवू शकत नाही, भारताला पावसाचाच फायदा होईल.

IND vs AUS: सुपर ओव्हर ड्रॉचे नियम काय सांगतात?

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामना अनिर्णित राहिल्यास दोघांमध्ये सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. 2019 च्या विश्वचषकात इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात घडल्याप्रमाणे दोघांमधील सुपर ओव्हरही ड्रॉ झाली तर काय होईल? काय आहेत आयसीसीचे नवे नियम..

या परिस्थितीत, सामन्याचा निकाल घोषित होईपर्यंत दोन्ही संघांमध्ये सुपर ओव्हर होत राहतील. याचा अर्थ 2019 चे ICC नियम बदलले आहेत. यावरून या सामन्याचा निकाल नक्की कळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अधिक चौकार मारण्याच्या आधारावर विजेता घोषित केला जाणार नाही.


हेही वाचा:

 

Leave A Reply

Your email address will not be published.