IND vs SL: ACC पुरुष अंडर-19 आशिया चषक (U-19 Asia Cip) स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यूएईमध्ये खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला.
संघाच्या विजयात सर्वात मोठा वाटा आयपीएल लिलावात सर्वांत चर्चेचा खेळाडू ठरलेल्या 13 वर्षीय वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने उचलला आहे.. त्याने अवघ्या 36 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 67 धावांची स्फोटक खेळी खेळून भारतीय संघाला अंतिम फेरीत प्रवेश मिळवून दिला आहे.
IND vs SL: वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) खेळली स्फोटक खेळी, श्रीलंकेचा मोठा पराभव!
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. संघाला पूर्ण 50 षटकेही खेळता आली नाहीत. श्रीलंकेचा संघ 46.2 षटकांत 173 धावांत गडगडला.
174 धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. सलामीचे फलंदाज आयुष म्हात्रे (Ayush Mhatre ) आणि वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) यांनी पहिल्या विकेटसाठी 91धावांची भागीदारी केली. आयुष म्हात्रे 9 व्या षटकात 34 धावा काढून बाद झाला. तो बाद झाल्यानंतर वैभव सूर्यवंशीने दहाव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याचवेळी टीम इंडियाने अवघ्या 10 षटकांत 100 धावा केल्या होत्या.
या सामन्यात वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. पण तो 14व्या षटकात प्रवीण मनीषाच्या हातून बाद झाला. यानंतर कर्णधार मोहम्मद अम्मान आणि सिद्धार्थ सी यांनी आघाडी घेत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
IND vs SL: वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ने दुल्निथ सिगेराच्या एका षटकात चोपल्या 31 धावा!
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) एकाच षटकात 31 धावा दिल्या होत्या. या सामन्यापूर्वी त्याने दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता. यानंतर त्याने दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर 6 आणि 4 धावा ठोकल्या.
तर चौथा चेंडू दुल्निथ सिगेराने वाईड टाकला आणि त्यातही वैभव सूर्यवंशीने 5 धावा केल्या. चौथ्या चेंडूवर वैभव एकही धाव करू शकला नाही. पण वैभवला 5 व्या चेंडूवर बाय म्हणून 4 धावा मिळाल्या. त्याचवेळी त्याने ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर 6 धावा ठोकल्या.
येथे पहा व्हायरल व्हिडीओ.
VAIBHAV SURYAVANSHI STORM!!
-Smashed 31 runs in a single over!
-Scored 50* in just 24 balls.
-6 Fours and 4 Sixes. pic.twitter.com/OVqSlBEj95— Sports Culture (@SportsCulture24) December 6, 2024
श्रीलंकेविरुद्ध त्याने 36 चेंडूत 67 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 5 षटकार मारले. या सामन्यात त्याचा स्ट्राईक रेट 186 होता.
हेही वाचा: