IPL 2025: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 1 ऑक्टोबर रोजी संपली आहे. टीम इंडियाने ही मालिका 2-0 ने जिंकली आहे. या मालिकेत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने अप्रतिम गोलंदाजी सादर केली.
बुमराहने कानपूर कसोटीत एकूण 6 विकेट घेतल्या. ज्यामध्ये पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट्स घेतल्या होत्या. आता या माजी दिग्गजाने आयपीएलमधील बुमराहच्या लिलावाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
IPL 2025 आधी जसप्रीत बूमराह बाबतीत हरभजन सिंगने केला मोठा दावा
आजकाल हरभजन सिंग लेजेंड लीग क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, हरभजनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे यानंतर भज्जीने आपली पोस्ट पुन्हा पोस्ट केली आणि लिहिले की, आयपीएलच्या सर्व 10 संघ बुमराहसाठी बोली लावून लढतील. त्याला कर्णधारपदही मिळू शकते. मला विश्वास आहे की बुमराहला दरवर्षी 30 ते 35 कोटी रुपये सहज मिळतील.
बुमराहला सध्या मुंबई इंडियन्सकडून मिळतात 12 कोटी रुपये!
If @Jaspritbumrah93 put himself in the Auction . we will be the highest paid IPL player in the history of IPL ! Agree people ? pic.twitter.com/5iqhUvUKMV
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) September 29, 2024
जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. या मेगा लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सला प्रथम बुमराहला कायम ठेवायचे आहे. आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने बुमराहला 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. त्यानंतर आता IPL 2025 च्या मेगा लिलावात बुमराहची किंमत वाढण्याची शक्यता आहे. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघातील सर्वात धोकादायक गोलंदाज आहे, संघ त्याला कोणत्याही किंमतीत कायम ठेवू इच्छितो.
बुमराहची आयपीएलमधील आकडेवारी (Jasprit Bumrah Ipl Carrer)
जसप्रीत बुमराहने आतापर्यंत आयपीएलमध्ये १३३ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये बुमराहने शानदार गोलंदाजी करताना 165 विकेट घेतल्या आहेत. बुमराहचा आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे १० धावांत ५ बळी. आयपीएल 2024 मध्ये, बुमराहने 20 विकेट घेतल्या आणि या हंगामात सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला होता.