मोहम्मद सिराज: भारत आणि ऑस्ट्रोलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा कसोटी सामना चांगलाच गाजला. या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रोलियाने तब्बल 10 विकेट्सने टीम इंडियाचा पराभव केला. या सामन्यादरम्यानदुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने ट्रॅव्हिस हेडला 140 धावांवर क्लीन बोल्ड केले, त्यानंतर मैदानावरील वातावरण चांगले तापले होत.
विकेट घेतल्यानंतर सिराजने आक्रमक पद्धतीने हेडला निरोप दिला आणि पॅव्हेलियनमध्ये परतण्याचे संकेत दिले.ज्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यावर आता दोन्ही खेळाडूंनी आपापली प्रतिक्रिया दिली आहे.
याआधी ट्रॅव्हिस हेडने या घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली होती, मात्र आता मोहम्मद सिराजनेही आपली बाजू मांडत हेडला खोटारडे म्हटले आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ट्रॅव्हिस हेड म्हणाला,
“मी सिराजला कोणत्याही प्रकारची शिवी दिली नाहीये उलट मी, ‘वेल बोल्ड’ असे म्हटले होते पण त्याचा गैरसमज झाला. जर त्याला तसे वागायचे असेल तर ते ठीक आहे. ”
हेडचे हे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. ट्रॅव्हिस हेडच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 157 धावांची भक्कम आघाडी घेतली होती.
हेडच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मोहम्मद सिराज म्हणाले, “हेडने दिलेली शिवी चुकीची होती. मी त्याचा अपमान करण्यासाठी काहीही बोललो नाही हे तुम्ही टीव्हीवर पाहू शकता. माझा उत्सव हा एक मार्ग होता. पत्रकार परिषदेत ट्रेव्हीस हेड जे बोलले ते चुकीचे आहे. तो असा दावा करत आहे की त्याने ‘चांगली गोलंदाजी केली’ असे म्हटले आहे, परंतु ते कुठेही दिसत नाही.” उलट त्याच्या ओठांवर लक्ष दिले तर स्पष्टपणे कळतंय की ते शिवी देत होता.
सर्व खेळाडूंचा आदर करतो, पण हेडने ही घटना ज्या पद्धतीने सर्वांसमोर मांडली, ते योग्य वाटले नाही, असेही सिराज म्हणाला.
मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हीस हेड यांच्यात नक्की काय झाले ?
दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने जेव्हा हेड ला बोल्ड केले आणि सिराजने जल्लोष केला तेव्हा हेडने त्याला एक शिवी दिली,अस सिराजच म्हणने आहे ज्यानंतर सिराज मैदानावर खूप भडकलेला दिसला. त्याने थेट हातवारे करून हेडला परत जायला संगीतले. घटनेच्या वेळी स्टंप माइकमध्ये काहीही रेकॉर्ड केले गेले नाही, ज्यामुळे कोण खरे बोलत आहे हे स्पष्ट होऊ शकले नाही.
मात्र, व्हायरल व्हिडीओमध्ये हेडने ‘वेल बोल्ड’ म्हटले नसल्याचे दिसत आहे. सिराजने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या, त्यात ट्रॅव्हिस हेडची विकेट सर्वात महत्त्वाची होती, कारण त्याची 140 धावांची खेळी ऑस्ट्रेलियाला सामन्यात मजबूत स्थितीत घेऊन जात होती. यामुळे ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 गडी राखून पराभव करत पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
हेही वाचा: