Rohit Sharma test Innings: भारतीय कर्णधार रोहित शर्मा सध्या सर्वांत खराब फॉर्म मधून जात आहे. आधी न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात अपयशी ठरलेला रोहित शर्मा आता ऑस्ट्रोलिया विरुद्ध (IND vs AUS) दुसऱ्याकसोटी सामन्यात देखील अपयशी ठरला.. दोन्ही डावांत तो एकही मोठी खेळी करू शकला नाहीये. त्यानंतर आता रोहित शर्माच्या कामगिरीवर प्रश्न चिन्ह उपस्थिती केले जात आहेत. आणि रोहीतची मागची कामगिरी पाहता हे नक्कीच चिंताजनक आहे.
12 डावात फक्त 142 धावा. फलंदाजीची सरासरी फक्त 11.83. या 12 डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक झळकले आहे.. कर्णधारपदाखाली संघ फ्लॉप होत आहे, यासोबतच रोहितचा फॉर्म सुद्धा चिंतेचा विषय होत चालला आहे. ॲडलेडमध्ये हिटमॅननेही आपली बॅटिंग पोझिशन बदलण्याचा प्रयत्न केला, पण त्याला हवे असतानाही त्याचा खराब फॉर्म बदलता आला नाही. क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये रोहित वाईट टप्प्यातून जात आहे आणि भारतीय कर्णधाराची फलंदाजी पाहता त्याला आवश्यकतेपेक्षा जास्त दडपण जाणवत असल्याचे स्पष्टपणे दिसते.
Rohit Sharma test Innings: रोहित शर्माची मागच्या काळातील कामगिरी!
रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमध्ये धावांसाठी वाईट संघर्ष करत आहे. गेल्या 12 डावांमध्ये रोहितच्या बॅटमधून फक्त एकच अर्धशतक झळकले आहे. रोहितची फलंदाजीची सरासरी केवळ 11.83 आहे, तर त्याच्या बॅटमधून केवळ 142 धावा झाल्या आहेत. पर्थ कसोटीला मुकल्यानंतर रोहित जेव्हा ॲडलेडला परतला तेव्हा सर्वांनाच भारतीय कर्णधाराकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण फलंदाजीची स्थिती बदलून रोहितने स्वत:वरच अधिक दडपण घेतल्यासारखे वाटले.
गुलाबी चेंडू कसोटीच्या पहिल्या डावात रोहितने २३ चेंडूंचा सामना केला, मात्र त्याच्या बॅटमधून केवळ ३ धावा आल्या. संघाला डावलून कर्णधार पॅव्हेलियनमध्ये परतला. दुस-या डावातही संघाच्या ढासळत्या खेळीकडे लक्ष देण्याची गरज असताना रोहित 6 धावा करून पॅव्हेलियनच्या दिशेने गेला. ज्यामुळे आता त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये रोहित शर्मासाठी काहीही योग्य नाही. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला मागील चार कसोटी सामन्यांमध्ये सलग पराभवाचा सामना करावा लागला आहे. कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात होते, मात्र आता रोहितची फलंदाजीही टीकाकारांच्या निशाण्यावर आहे.
ॲडलेडमधील पराभवानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी रोहितला कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सल्लाही दिला होता. भारतीय कर्णधाराला त्याच्या खराब फॉर्मवर लवकरच इलाज शोधावा लागेल, कारण रोहितची स्थिती संपूर्ण ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अशीच राहिली तर संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांवर कठोर कारवाई करण्याचा दबाव असेल.
हेही वाचा: