U-19 Asia Cup 2024: दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंडर-19 आशिया चषक 2024 च्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताला पराभूत करत मोठा पराभव केला आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयासह बांगलादेशने आपल्या विजेतेपदाचा यशस्वी बचाव केला. अंतिम सामना कमी स्कोअरिंगचा होता, परंतु बांगलादेश संघाने चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.
U-19 Asia Cup 2024: बांग्लादेश ठरला सलग 2वेळा विश्वचषक जिंकणारा दुसरा संघ..!
बांगलादेश संघाने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावत इतिहास रचला. ही स्पर्धा 1989 मध्ये सुरू झाली आणि बांगलादेश आता या स्पर्धेचे विजेतेपद दोनदा जिंकणारा दुसरा संघ बनला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत 8 वेळा या स्पर्धेची ट्रॉफी जिंकली आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने प्रत्येकी 1 वेळा विजेतेपद पटकावले आहे. विशेष म्हणजे अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी झालेल्या सर्व फायनलमध्ये भारतीय संघाने विजेतेपद पटकावले होते.
U-19 Asia Cup 2024: l: बांग्लादेशने प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाला 199 धावांचे दिले लक्ष.!
नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने बांगलादेशला 198 धावांत रोखले. भारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली होती. युधाजित गुहा, चेतन शर्मा आणि हार्दिक राज यांनी 2-2 बळी घेतले, तर किरण चोरमले, केपी कार्तिकेय आणि आयुष म्हात्रे यांनी 1-1 बळी घेतला. बांगलादेशकडून रिझान हसनने सर्वाधिक 47 धावा केल्या. मोहम्मद शिहाब जेम्सने 40 आणि फरीद हसनने 39 धावांचे योगदान दिले.
190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. एकूण 4 धावांवर आयुष म्हात्रे बाद झाला. यानंतर विकेट्स पडण्याचे सत्र सुरूच राहिले आणि संघाला पुनरागमन करता आले नाही. वैभव सूर्यवंशी 9 धावा करून बाद झाला, केपी कार्तिकेय 21 धावा करून बाद झाला आणि सी आंद्रे सिद्धार्थ 20 धावा करून बाद झाला.
निखिल कुमारला खातेही उघडता आले नाही. कर्णधार मोहम्मद अमानने संघर्षपूर्ण खेळी नक्कीच खेळली, पण त्याचे प्रयत्नही संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयशी ठरले. आणि भारतीय संघाला हा सामना 59 धावांनी गमवावा लागला. यासह विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भारताचे अपूर्ण राहिले.
हेही वाचा: