Vinod Kambli Health Update: माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी त्याच्या खराब प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल झाल्यानंतर विनोद कांबळी यांच्या तब्येतीबाबत सर्वच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांना चिंता वाटत होती मात्र आता हॉस्पिटलकडून त्याच्या तब्येतीबाबत अधिकृत माहिती दिली गेली आहे.
Vinod Kambli Health Update: क्या म्हणाले आकृती रुग्णालयातील डॉक्टर ?
आकृती रुगालयात ज्या डॉक्टरकडे विनोद कांबळी यांना रेफर करण्यात आले होते ते कांबळीचे फिजिशियन डॉ. विवेक यांनी सांगितले की, त्यांच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. आणि आता त्यांची तब्येत स्थिर असून ते उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत.
विनोद कांबळीनेही मानले डॉक्टरांचे आभार.
तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर स्वतः विनोद कांबळी यांनी डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तसेच सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानले असल्याचे त्यांनी सांगितले. डॉक्टरांचे आभारा मानताना कांबळी म्हणाले की,
माझ्या उपचारात आणि काळजीत त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. कांबळीचे फिजिशियन डॉ. विवेक यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना पहिल्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यांच्यामुळेच मी आज जिवंत आहे.
VIDEO | Former Indian cricketer Vinod Kambli was admitted to Akruti Hospital, a private facility in Thane, Maharashtra, on Saturday, December 21, after his health condition deteriorated.
The 52-year-old was brought to the hospital by one of his fans who also owns the hospital in… pic.twitter.com/128LnbYkcu
— Press Trust of India (@PTI_News) December 23, 2024
डॉक्टर विवेकने Sports Wordz ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कांबळीला जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा तो मृत्यू आणि जीवन यांच्यात लढत होता. त्यांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला खूप ताप आला होता, चक्कर येत होती आणि त्याला नीट बसताही येत नव्हते आणि चालण्याचीही स्थिती नव्हती.
विनोद कांबळी ला कोणता आजार आहे?
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, विनोद कांबळी यांची संपूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांच्या शरीरात इलेक्ट्रोलाइट असंतुलन असल्याचे आढळून आले आणि मूत्रमार्गात संसर्ग पसरला होता. सोडियम आणि पोटॅशियमचे प्रमाण कमी झाले होते, त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाहही कमी झाला होता. त्यामुळे त्याच्या संपूर्ण शरीराला पेटके येऊ लागले.
आकृती रुग्णालयाचे प्रभारी एस.सिंग यांनी विनोद कांबळी यांच्यावर मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे. विनोद कांबळी यांना आयुष्यभर रुग्णालयातून मोफत उपचार घेता येणार असल्याचे ते सांगतात. यामुळे विनोद कांबळीला आणखी धीर आला असून आता त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली झाली आहे.
अनेक वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला विनोद कांबळी गेल्या वर्षी सचिन तेंडुलकरसोबत एका कार्यक्रमात दिसला होता. इतक्या वर्षांनी प्रसिद्धीच्या झोतात कांबळीला कॅमेऱ्यात पाहून सर्वांनाच धक्का बसला. कांबळीला चालण्यासाठी आधार घ्यावा लागला.
विनोद कांबळी यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले की, एक महिन्यापूर्वी ते अचानक जमिनीवर पडले, त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत विनोद कांबळीने सांगितले की, मी लघवीच्या समस्येशी झुंजत होतो. माझा मुलगा, मुलगी आणि पत्नीने मला खूप साथ दिली. माझे डोके अचानक फिरू लागले आणि मी बेशुद्ध पडलो. त्यानंतरही मला रुग्णालयात दाखल करावे लागले.
आता विनोद कांबळीची तब्येत ठीक असून तोहळू हळू त्यातून सावरत आहे..
हेही वाचा: