दोस्ती मैं बदली दुश्मनी! मैत्रीच्या रंगात रंगले विराट कोहली -नवीन हक, पहा व्हिडिओ

दोस्ती मैं बदली दुश्मनी! मैत्रीच्या रंगात रंगले विराट कोहली -नवीन हक, पहा व्हिडिओ

 

दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने अफगाणिस्तानचा पराभव करत विश्वचषकात सलग दुसरा विजयाची नोंद केली. कर्णधार रोहितने विस्फोटक शतकी खेळी करत भारतातर्फे विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला. पहिल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध च्या पहिल्या सामन्यात भोपळाही फोडू न शकणाऱ्या रोहितने 131 धावांची विस्फोटक खेळी केली. याच सामन्यात विराटने देखील 55 धावांची सुरेख अर्धशतकी खेळी करत भारताला सफाईदारपणे विजय मिळवून दिला.

भारत आणि अफगाणिस्तान या सामन्यात ‘दोस्ती मे बदली दुश्मनी’ असे चित्र पाहायला मिळाले. त्याचे झाले असे की, यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशन हा बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर विराट कोहली फलंदाजीस आला. प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियम मधून विराट-विराट असा आवाज येऊ लागला. विराटला प्रेक्षकांकडून मिळणारे प्रोत्साहन पाहून अफगाणिस्तानी कर्णधाराने नव्या दमाचा खेळाडू नवीन उल हक याला गोलंदाजीसाठी पाचारण केले. नवीन गोलंदाजीला आल्यानंतर प्रेक्षकांनी त्याची टर उडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर विराटने प्रेक्षकांना शांत राहण्यासाठी हाताने इशारा करून सांगितला. विराटने दिलेली सूचना मनावर घेत प्रेशक शांत राहिले. प्रेक्षक शांत होताच विराट अन नवीन एकमेकांशी हसत हसत हस्तांदोलन करत गळाभेट घेतली. जणू काही दोघेही मैत्रीच्या रंगात रंगून गेल्याचे दिसून आले. दोघांच्या हावभावावरून त्यांच्यामधला वाद मिटल्याचे दिसून येत होते.

दोस्ती मैं बदली दुश्मनी! मैत्रीच्या रंगात रंगले विराट कोहली -नवीन हक, पहा व्हिडिओ

वास्तविक पाहता, 2023 च्या आयपीएल स्पर्धेत विराट कोहली आणि नवीन उल हक या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. आयपीएल मध्ये नवीन लखनऊ संघाकडून तर विराट बंगळूर संघाकडून खेळत होते. या दोघांमध्ये चांगली तू तू मैं मैं रंगली होती. दोघांमधला हा वार कित्येक दिवस सोशल मीडियावर देखील सुरू होता.

नवीन विराटचा हात धरून भांडत होता. त्यावेळी विराटनेही त्याला प्रत्युत्तर देत नवीन ला बूट देखील दाखवला होता. विराट अन नवीनच्या वादात मेंटर गौतम गंभीर ने उडी घेत विराटशी भिडला होता. सामन्यानंतर नवीन ने विराट कोहलीचे आपल्या ट्विटर हँडल वरून आभार देखील मानले.

भारताचा पुढचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध शनिवारी 14 ऑक्टोंबर रोजी अहमदाबादच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्या विषयी क्रिकेट प्रेमींना कमालीची उत्सुकता आहे. आतापर्यंत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला प्रत्येक वेळी पराभूत केले आहे. यापूर्वी दोन्ही संघात आशिया कप स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा दारुण पराभव केला होता.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..