WTC Final Points Table: दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर विजय आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) भारताचा पराभव झाल्यानंतर टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या (WTC Final) शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका आहे. काल ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १० गडी राखून पराभव केला होता. आज दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा 109धावांनी पराभव केला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ ऑस्ट्रेलियाला हरवून गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे, टीम इंडियासाठी आता पुढचा रस्ता खूपच कठीण दिसत आहे.
WTC Final Points Table: आजून एक पराभव आणि टीम इंडियाWTC Final मधून बाहेर होणार.
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. ज्यामध्ये एक सामना भारताने तर एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे. आता मालिकेत तीन सामने बाकी आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये (WTC Final )आपले स्थान पक्के करायचे असेल, तर हे तीन सामने जिंकावे लागतील, जे भारतासाठी तितके सोपे असणार नाही. याशिवाय टीम इंडियाने येथून एकही सामना गमावला तर ते फायनलच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडेल.
मात्र, टीम इंडियाला इतर संघांवर अवलंबून राहावे लागणार आहे, त्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठण्याची शक्यता कमी असेल. आणि जर टीम इंडियाने ऑस्ट्रोलीयावीरुद्ध च्या उर्वरित 3 सामन्यांपैकी सर्व सामने जिंकले तर टीम इंडिया कसल्याही अडथळ्याशिवाय WTC Final सामना खेळू शकणार आहे .
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटची मालिका खेळत आहे. याशिवाय या मालिके नंतर ऑस्ट्रेलियाला श्रीलंकेविरुद्ध (AUS vs SL) शेवटची मालिका खेळायची आहे. या मालिकेत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले तर टीम इंडियाचा फायदा होईल. जर भारताला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्याला गुणतालिकेत अव्वल-2 मध्ये राहावे लागेल. अंतिम सामना फक्त टॉप-2 संघांमध्येच खेळवला जाईल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. यानंतर आफ्रिकेला पाकिस्तानसोबत मायदेशात कसोटी मालिका खेळायची आहे, अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेची अंतिम फेरी गाठण्याची शक्यता सर्वाधिक वाढली आहे. आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर श्रीलंका संघाच्या गुणांमध्ये घट झाली असली तरी संघ चौथ्या स्थानावर कायम आहे.
हेही वाचा:
- India vs Australia 3rd Test Match: तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये मोठे बदल, रोहित शर्मा या 2 खेळाडूंना काढणार बाहेर..!
- IND Vs AUS Women 2nd ODI: पुरुष संघानंतर आता ऑस्ट्रोलीयाच्या महिला संघानेही भारतीय महिला संघाचा केला परभव, एकाच दिवशी दोन्ही भारतीय संघ पराभूत..
- Babar Azam Net Worth: तब्बल एवढ्या कोटींचा मालक आहे बाबर आझम, महागड्या गाड्या ते कोट्यावधींचे घरे.