ENG vs NZ: हॅगली ओव्हल, क्राइस्टचर्च येथे रविवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत 104 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करून इंग्लंडने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक नवा विक्रम रचला आहे. नक्की कोणता आहे हा विक्रम जाणून घेऊया सविस्तर..
ENG vs NZ: सर्वांत जास्त धावगतीने कसोटी जिंकणारा इंग्लंड ठरला पहिला संघ.
इंग्लंडने हे लक्ष्य 8.21 च्या धावगतीने केवळ 12 षटकांत गाठले, जे 100 किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करताना कोणत्याही संघाचा आतापर्यंतचा सर्वोच्च धावगती आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर होता, ज्याने 1983 मध्ये भारताविरुद्ध 6.82 च्या धावगतीने 172 धावा केल्या होत्या.
104 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने लवकर विकेट गमावल्या, परंतु बेन डकेट (18 चेंडूत 27), जेकब बेथेल (37 चेंडूत नाबाद 50) आणि जो रूट (15 चेंडूत नाबाद 23) यांच्या शानदार खेळीने संघाला विजय मिळवून दिला. .
तत्पूर्वी, केन विल्यमसन (93) आणि ग्लेन फिलिप्स (58) यांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या डावात 348 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या ब्रायडन कार्सने ४/६४ आणि शोएब बशीरने ४/६९चे आकडे नोंदवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने हॅरी ब्रूक (171), ऑली पोप (77) आणि बेन स्टोक्स (80) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर 499 धावा केल्या.
ENG vs NZ: 6 डिसेंबरपासून वेलिंग्टन येथे दुसरी कसोटी
दुसऱ्या डावात न्यूझीलंडचा डाव 254 धावांवर आटोपला. कारसेने एकूण 10 विकेट घेत ‘प्लेअर ऑफ द मॅच‘चा किताब पटकावला. तीन सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने १-० अशी आघाडी घेतली आहे. दुसरी कसोटी ६ डिसेंबरपासून वेलिंग्टन येथे खेळवली जाणार आहे.
इतर ताज्या घडामोडी:
INDU19 vs PAKU19: पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरला 13 वर्षाचा वैभव सूर्यवंशी, काढू शकला फक्त 1 धाव…