IPL 2025 RCB Captain: जसी जसी आयपीएल 2025 (IPL 2025) सुरु होण्याची तारीख जवळ येत आहे तसी तसी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नवीन कर्णधाराबद्दल (IPL 2025 RCB Captain) बरीच अटकळ आहे. आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचे नेतृत्व करणारा फाफ डू प्लेसिस आता संघाचा भाग नाही. दुसरीकडे, फ्रँचायझीनेही अद्याप नवीन कर्णधाराची घोषणा केलेली नाही.
IPL 2025 RCB Captain: विराट कोहली नाही होणार आरसीबीचा कर्णधार.
विराट कोहलीला पुन्हा एकदा संघाचा कर्णधार बनवण्याची चर्चा सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये सुरू आहे. आता मात्र दुसऱ्याच खेळाडूचे नाव समोर येत आहे जो आरसीबीचा नवा कर्णधार होऊ शकतो. मुख्य म्हणजे संघाच्या मालकांनी सुद्धा त्याच्या नावाला होकार दिल्याचे समोर आले आहे. नक्की कोण आहे हा खेळाडू? पाहूया सविस्तर..
IPL 2025 RCB Captain: भूवेन्श्वर कुमार होऊ शकतो आरसीबीचा नवा कर्णधार..
सध्या आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून विराट कोहलीचे नाव आघाडीवर आहे. मात्र, अद्याप काहीही निर्णय झालेला नाही. याशिवाय कृणाल पांड्याकडे आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. यावेळी मुंबई इंडियन्सने क्रुणालला सोडले होते आणि आरसीबीने त्याला चांगली बोली लावून आपल्या संघाचा हिस्सा बनवले आहे.
Our stars dazzled in #SMAT with performances that lit up the day! 🌟
▪️ Rajat on fire with a hat-trick of fifties 🔥
▪️ Bhuvneshwar’s spellbinding bowling 🪄#PlayBold pic.twitter.com/0l6V2l0r0I— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) November 29, 2024
आरसीबीने मेगा लिलावात क्रुणालला 5.75 कोटी रुपयांना खरेदी केले आहे, परंतु आता अशी अटकळ बांधली जात आहे की विराट कोहली किंवा कृणाल पांड्या यापैकी कोणीही नाही तर हा तिसरा खेळाडू आरसीबीचा नवा कर्णधार होऊ शकतो.
गेल्या 11 वर्षांपासून सनरायझर्स हैदराबादकडून खेळत असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार यावेळी आरसीबीचा भाग आहे. मेगा लिलावात आरसीबीने भुवीला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यानंतर आता भुवनेश्वरकडेही नवा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे.
भुवनेश्वरने यापूर्वीही आयपीएलचे नेतृत्व केले आहे. जर विराट कोहलीने कर्णधार होण्यास नकार दिला तर फ्रँचायझी भुवनेश्वर कुमारला आरसीबीचा नवा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे. मात्र, फ्रँचायझीकडून याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.