Pushpa 2 the rule Review: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा बहुचर्चित ‘पुष्पा 2- द रूल’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी कमालीची कमाई केली आहे.
या चित्रपटाने चाहत्यांना त्याच्या पहिल्या भागापेक्षा जास्त प्रभावित केले आहे. चित्रपटात अशी अनेक दृश्ये आहेत जी पाहून मन हेलावून सोडते. आम्ही तुम्हाला या चित्रपटातील 5 असे प्रभावी कारणे सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही पुष्पा 2 हा चित्रपट गृहांमध्येच जाऊन पहिला पाहिजे… हे कारने वाचून तुम्ही नक्कीच अल्लू अर्जुनच्या अभिनयाचे आणि दिग्दर्शक सुकुमार यांचे कौतुक कराल.
या 5 सिन्स साठी पुष्पा 2 एकदा सिनेमा गृहात जाऊन पहाच. (Why should watch pushpa 2 in thetre)
1.अल्लू अर्जुनची अप्रतिम एन्ट्री
अल्लू अर्जुनची ‘पुष्पा’ ही व्यक्तिरेखा जेव्हा पहिल्यांदा चित्रपटात येते तेव्हा तो गाडीतून खाली उतरतो. ते दृश्य पाहून चाहतेही आनंदाने वेडे होतात. या चित्रपटाची चाहत्यांमध्ये एवढी उत्सुकता होती की, अल्लू अर्जुनची ग्रँड एन्ट्री पाहूनच सर्व चाहते आनंदी होत आहेत. पुष्पा ची ही ग्रँड एन्ट्री प्रत्येकाने एकदा मोठ्या पडद्यावर अवश्य पाहायला हवीच..
2. अल्लू अर्जुनचा मां काली अवतार
अल्लू अर्जुनचे पात्र पुष्पा जेव्हा चित्रपटात मां कालीच्या अवतारात येते तेव्हा प्रेक्षकांमध्ये उत्साह शिगेला पोहचतो. संपूर्ण थिएटरमध्ये टाळ्या आणि शिट्ट्या वाजत आहेत. माँ कालीच्या वेषात ‘पुष्पा’ जेव्हा गरम अंगारावर चालते तेव्हा प्रत्येकाच्या हृदयातून एकच आवाज येतो आणि तो म्हणजे पुष्पा-पुष्पा!
शिवाय अल्लू अर्जुनने या गेटअप मध्ये उत्कृष्ट नृत्य केले आहे, याशिवाय पुष्पाचा झुकेगा नही Attitude सुद्धा या पात्रात एक वेगळ्याच उंचीवर गेलेला दिसतोय.
3. चित्रपटाचा क्लायमॅक्स सीन
चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये, जेव्हा पुष्पा तिच्या भाचीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला मारतो, तेव्हा सिनेमागृहातील प्रेक्षकांचा जल्लोष आणि उत्साह दिसून येतो
महत्वाचे म्हणजे त्या अपहरण कर्त्यांना मुख्यमंत्री प्रताप रेड्डी यांच्या नातेवाईकाचा खूप प्रभाव असल्याने त्याला मारू नका असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले जाते, परंतु पुष्पा सीएमचे ऐकत नाही आणि थेट अपहरणकर्त्याच्या छातीत त्रिशूळ मारतो. हा सीन पाहताना प्रेक्षकांच्या अंगावर काटा येतो..
वरील सर्व कारणांमुळे मित्रानो तुम्ही ‘पुष्पा 2- द रूल ‘ हा चित्रपट एकदा सिनेमागृहांत नक्कीच जाऊन पाहायला हवा. यासारखा भव्यदिव्य चित्रपट सारखा सारखा सिनेमागृहात येत नाही..
हेही वाचा: