IND vs AUS 2nd test: ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. यातील दुसरा कसोटी सामना (IND vs AUS 2nd test) उद्या म्हणजेच 6 डिसेंबर पासून खेळवला जाणार आहे. हा कसोटी सामना पिंक बॉल म्हजेच डे-नाईट कसोटी सामना असणार आहे.
IND vs AUS 2nd test सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिले मोठे वक्तव्य!
ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या कसोटी मालिकेत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारा संघ निच्छित होणार आहे. मागच्या वेळी जेव्हा टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होती, तेव्हा गाब्बामध्ये नेत्रदीपक विजय मिळवला होता. ऋषभ पंत भारताचा स्टार फलंदाज म्हणून उदयास आला होता. याआधी आता ऑस्ट्रोलियाचा दिग्गज अनुभवी ऑफ स्पिनर गोलंदाज नॅथन लियॉनने मोठ वक्तव्य केले आहे.
अनुभवी ऑफस्पिनर नॅथन लियॉन यावेळी त्याच्या संघाच्या संभाव्यतेबद्दल सकारात्मक आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले,
ऑस्ट्रेलियाला भारताविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत सलग पराभवाला सामोरे जावे लागले आहे, परंतु कांगारूंनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये मायदेशात भारताचा पराभव केला आहे. लियॉन पुढे म्हणाला, “मागील एका सामन्यात भारताने आम्हाला पराभूत केले आहे. पण जर तुम्ही इंग्लंडमधील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (फायनल) बघितले तर आम्ही त्यांना तिथे पराभूत करू शकलो.” आणि पिंक बॉल कसोटीमध्ये आमचा रेकोर्ड हा टीम इंडियाच्या दुप्पट चांगला आहे. त्यामुळे नक्कीच या दुसऱ्या कसोटी सामन्यात आणि भारताचा पराभव करून मालिकेत पुनरागमन करू.
पुढे बोलतांना नॅथन लियॉन म्हणाला की,
, “आम्ही एका जागतिक दर्जाच्या संघाविरुद्ध खेळत आहोत, पण एक ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ म्हणून आम्ही जिथून आहोत तिथून आम्ही खूप आत्मविश्वास घेऊ शकतो. मला वाटते की आम्ही एक उत्कृष्ट संघ बनण्याच्या मार्गावर आहोत.”
भारताने ऑस्ट्रेलियाचे मागील दोन कसोटी दौरे 2-1 अशा फरकाने जिंकले आहेत, परंतु ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी टीम इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला न्यूझीलंडविरुद्ध मायदेशातील मालिका 0-3 ने गमावली होती.
मात्र ऑस्ट्रोलीयातील पर्थ कसोटी सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास बळावला आहे. टे नक्कीच तगड्या ऑस्ट्रोलिया ला आव्हान देतील. हा सामना IND vs AUS 2nd test ) उद्या सकाळी 9:30 पासून सुरु होणार आहे.
हेही वाचा: