IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे.
प्रथम नाणेफेक जिकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने फलंदाजीचा निर्णय घेतला मात्र त्याचा हा निणर्य ऑस्ट्रोलियाच्या गोलंदाजांनी चुकीचा ठरवत भारतीय संघाला सुरवातीपासूनच धक्क्यावर धक्के दिले. सलामीवर यशस्वी जैस्वालच्या रूपाने पहिल्याच चेंडूवर ऑस्ट्रोलियाला पहिली सफलता मिळाली.
त्यांनतर मिचेल स्टार्कच्या घातक गोलंदाजीपुढे टीम इंडियाचे फलंदाज सहज शरणागती पत्करले आणि अवघ्या 180 धावा करून संपूर्ण संघ बाद झाला.
IND vs AUS: ऑस्ट्रोलिया फलंदाजी करतांना 2 वेळा थांबवावा लागला सामना,कारण काय ?
भारतीय संघाच्या 180 धावाच्या प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. मात्र त्यांचा डाव सुरु होताचमैदानावर अस काही घडल ज्यामुळे 2 वेळा सामना काही वेळासाठी थांबवावा लागला. कांगारू संघाच्या डावादरम्यान ॲडलेडच्या मैदानावर अचानक अंधार पडला, त्यामुळे दोनदा खेळ थांबवावा लागला.
मैदानाच्या मुख्य लाईटसचा सप्लाय बंद पडल्याने चालू सामन्यात मैदानावर अचानक अंधार पडला. त्यामुळे सामना थांबवत मैदानाच्या कर्मचाऱ्यांनी लाईट्सची दुरुस्ती केली. त्यांनतर पुन्हा सामना सुरु होताच काही वेळातच पुन्हा हाच प्रकार घडला ज्यामुळे परत 5 मिनिट सामना थांबवावा लागला.
यावेळी ऑस्ट्रोलिया संघाचे सलामीवीर मैदानात फलंदाजी करत होते. मात्र लाईटसच्या जाण्याने त्यांचा रिदम तुटला आणि एकजण लगेच बाद झाला. अश्या रीतीने भारतीय गोलंदाजाना पहिला विकेट्स मिळाला.
येथे पहा व्हायरल व्हिडीओ
The lights went out twice in quick succession at Adelaide Oval, but play has resumed. #AUSvIND pic.twitter.com/u6Jtd39Utc
— cricket.com.au (@cricketcomau) December 6, 2024
शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा, ऑस्ट्रोलीया 180 धावांचा पाठलाग करतांना 1 गडी गमावून 78 धावावर पोहचला आहे.
Title: Oval stadium lights gone during IND vs AUS 2nd live test match
हेही वाचा: