सिद्धार्थ कौलजॉईन स्टेट बँक ऑफ इंडिया : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्या संघातील स्पर्धेत सहभागी झालेले मोजकेच खेळाडू भारतीय वरिष्ठ संघात खेळू शकले आहेत त्यातील एक विराट कोहली आजूनही भारतीय संघाचा हिस्सा आहे . दुसरीकडे आज त्या संघातील बहुतेक खेळाडू हे क्रिकेटपासून दूर जीवन जगत आहेत.
अंडर-19 मध्ये विराटसोबत जबरदस्त कामगिरी करून निवड समितीचे लक्ष वाढणाऱ्या सिद्धार्थ कौलने (Siddharth Kaul) 28 नोव्हेंबर रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरु केल्याचे आपल्या सोशल मिडियावर सांगितले आहे.
Cricketer Siddharth Kaul Joined Sbi: निवृत्ती नंतर सिद्धार्थ लागला बँकेत कामाला!
क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बहुतेक खेळाडू समालोचन आणि क्रीडा विश्लेषक किंवा कोचिंगच्या जगात प्रवेश करतात. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांना 9 ते 5 काम करायला आवडते. या खेळाडूंमध्ये सिद्धार्थच्या (Siddharth Kaul) नावाचाही समावेश आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने चंदीगडमधील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आपल्या नवीन नोकरीचा फोटो शेअर केला आहे.
तब्बल 17 वर्ष चालली सिद्धार्थ कौलची अंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द!
सिद्धार्थ कौलची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द 17 वर्षांनंतर संपुष्टात आली आहे. त्याने आयपीएलमध्ये अनेक संघांसाठी सामने खेळले आहेत. देशांतर्गत स्पर्धांमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. मात्र, असे अनेक प्रसंग आले जेव्हा सिद्धार्थ कौलला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली मात्र तो भारतीय संघासाठीखास अशी कामगिरी करू शकला नाही.
2008 मध्ये, माजी वेगवान गोलंदाजाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय अंडर-19 संघासाठी चमकदार कामगिरी केली होती. या स्पर्धेत सिद्धार्थने 10 विकेट्स घेतल्या होत्या.
सिद्धार्थ कौल क्रिकेट कारकीर्द (Siddharth Kaul Cricket Carrer)
भारताकडून 3 वनडे सामने खेळलेल्या सिद्धार्थने एकही विकेट आपल्या नावावर नाहीये. याशिवाय या खेळाडूने 3 टी-20 सामन्यांमध्ये 4 फलंदाजांना आपला बळी बनवले आहे. 2019 मध्ये त्याने भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. यानंतर या वेगवान गोलंदाजाला भारतीय संघात संधी मिळाली नाही.
सिद्धार्थ कौलची आयपीएल मधील कामगिरी (Siddharth Kaul IPL carrer)
आयपीएलबद्दल बोलायचे झाले तर ,तो 2013 ते 2014 दरम्यान दिल्लीकडून खेळला होता. यानंतर हैदराबादने 2017 मध्ये या खेळाडूला आपल्या संघाचा भाग बनवले. कौलचा हैदराबादचा प्रवास 2021 पर्यंत सुरू होता. त्याने 2022 मध्ये आरसीबीसाठी शेवटचा आयपीएल हंगाम खेळला होता. त्याने आयपीएलच्या 55 सामन्यात 58 विकेट घेतल्या आहेत.