शुभमन गिल नंतर आणखी एका भारतीयला झाली डेंग्यूची लागण; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आली मोठी धक्कादायक बातमी!

डेंग्यू ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,'चेस मास्टर'; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.

शुभमन गिल नंतर आणखी एका भारतीयला झाली डेंग्यूची लागण; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आली मोठी धक्कादायक बातमी!


भारतात सुरू असलेल्या 13व्या विश्वचषक स्पर्धेत आत्तापर्यंत दहा सामने पूर्ण झाले आहेत. प्रत्येक सामन्यात चौकार षटकारांचा पाऊस पडतोय. क्रिकेट फॅन्सचे चांगलेच मनोरंजन होत असले तरी दुसरीकडे मात्र डेंग्यू मच्छर ने थैमान घातले आहे. विश्वचषक स्पर्धा(World cup 2023) सुरू होण्यापूर्वी भारताचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाली होती. सध्या तो या आजारातून सावरत असला तरी आता एका भारतीय समालोचकाला डेंग्यूची लागण झाली आहे. शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्यात तो समालोचन करताना दिसून येणार नाही.

‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या हर्षा भोगले याला डेंग्यूची लागण झाली आहे. भारत आणि यांच्यात चेन्नई येते झालेल्या सामन्याच्या वेळी त्याला त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्याने मध्यंतरीच समालोचन सोडून हॉस्पिटल गाठले होते. 62 वर्षीय हर्षा भोगले यांनी त्यांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती त्यांच्या ट्विटर हँडल वरून दिली आहे.

शुभमन गिल नंतर आणखी एका भारतीयला झाली डेंग्यूची लागण; पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी आली मोठी धक्कादायक बातमी!
image courtesy: the week

हर्षा भोगले यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, मला आशा आहे की, 19 तारखेला पुणे येथे होणाऱ्या भारत-बांगलादेश सामन्यासाठी मी परत येईन. 14 ऑक्टोंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यासाठी मी उपलब्ध नसेल याची मला खंत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चेन्नई येथे झालेल्या सामन्याच्या वेळी मी माझे काम मध्यंतरी सोडून हॉस्पिटलला उपचारासाठी गेलो होतो तेव्हा माझ्या सहकारी मित्रांनी माझी खूप मदत केली, त्याबद्दल त्यांचे आभार”!

दोस्ती मैं बदली दुश्मनी! मैत्रीच्या रंगात रंगले विराट कोहली -नवीन हक, पहा व्हिडिओ

भारतीय संघाविषयी बोलायचे झाले तर भारताने आपला पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध सहा गडी राखून जिंकला आहे. त्यानंतर अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताने आठ गडी राखून विजय संपादन केला. या दोन्ही सामन्यात मिळालेल्या विजयामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. विश्वचषकात भारतीय संघाने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध सलग सात सामन्यात विजय मिळवला आहे. विश्वचषकापूर्वी दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेत एकमेका विरुद्ध भिडले होते तेव्हा भारतीय संघाने बाजी मारली होती.

डेंग्यू

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असल्याने भारतीय संघाला मोठा फायदा होऊ शकतो. भारतीय फलंदाज आणि पाकिस्तानी गोलंदाज यांच्यातील चांगलीच कडवी झुंज क्रिकेट प्रेमींना पाहता येणार आहे दुसरीकडे पाकिस्तान संघाविषयी बोलायचं झाले तर पाकिस्तान संघाने देखील सुरुवातीच्या दोन्ही सामने जिंकले आहेत पहिल्या सामन्यात त्यांनी नेदरलँड आणि दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा दारुण पराभव केला.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..