ICC Champion trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. स्पर्धेचे वेळापत्रक ठरवण्यासाठी होणारी बैठक आता 7 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) हायब्रिड मॉडेलला सहमती दर्शवल्याची बातमी आहे. अशा स्थितीत भारतीय संघाचे सामने आता पाकिस्तानऐवजी अन्य कोणत्या तरी देशात खेळवले जातील.
ICC Champion trophy 2025: 15 पैकी 5 सामने पाकिस्तानच्या बाहेर होतील.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसीने फायनलसह भारतीय संघाचे सर्व सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची योजना आखली आहे. आयसीसीच्या एका सूत्राने पीटीआयला सांगितले की, “सर्व पक्षांनी 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि UAE मध्ये होणार यावर सहमती दर्शवली आहे.
भारत आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे हा सर्वांसाठी फायदेशीर निर्णय आहे.” चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकूण 15 सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी भारतीय संघाचे गट टप्प्यातील सामने, दोन्ही बाद फेरीचे सामने आणि अंतिम सामने यूएईमध्ये आयोजित करण्याची योजना आहे.
ICC Champion trophy 2025: जर भारत अंतिम सामन्यात पोहचला नाही तर फायनल लाहोरमध्ये होणार?
जर भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचला नाही तर अंतिम सामना लाहोरमध्ये होऊ शकतो. मात्र, भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास हा सामना दुबईत खेळवला जाईल. आयसीसीने हे आधीच घोषित केले आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या आयसीसीच्या बैठकीत पीसीबीने स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी मागे घेतली आणि हायब्रीड मॉडेलला मान्यता दिली आहे. पीसीबीने 2031 पर्यंत हे मॉडेल स्वीकारण्याची मागणी केली होती, परंतु आयसीसीने ते 2027 पर्यंत लागू करण्यास मान्यता दिली. यादरम्यान,
भारत 2026 मध्ये श्रीलंकेसह पुरुषांच्या T20 विश्वचषकाचे आयोजन करेल. याचा सरळ अर्थ म्हणजेच पाकिस्तानचा संघही या आयसीसी स्पर्धांसाठी भारतात येणार नाही. ते देखील या दोन्ही स्पर्धेतील सामने हायब्रीड मॉडेल नुसार भारतापासून दूर कुठेतरी दुसऱ्या देशात खेळणार आणी जर पाकिस्तान अंतिम सामन्यात पोहचला तर स्पर्धेचा अंतिम सामना देखील भारतात होणार नाही..
आयसीसीची 5 डिसेंबरला झालेली बैठक काही मिनिटेच चालली. या वेळी स्पर्धेचे वेळापत्रक वारंवार पुढे ढकलण्याबाबत चर्चा झाली. हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याशिवाय पीसीबीकडे पर्याय नसल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आणि अखेर पीसीबीने त्यास सहमती दर्शवली. आता 7 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीनंतर स्पर्धेचे वेळापत्रक आणि इतर माहिती अधिकृतपणे जाहीर केली जाईल.
हेही वाचा: