IND vs AUS live: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची दुसरी कसोटी ॲडलेडमध्ये सुरू आहे. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताची सुरुवात खूपच खराब झाली, जिथे सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूवर कांगारू वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा बळी ठरला.
आऊटस्विंग चेंडूवर स्टार्कने त्याला एलबीडब्ल्यू केले. यासह स्टार्कने गेल्या सामन्यात जयस्वालकडून स्लेजिंग केल्याचा बदला घेतला आहे. पर्थमध्ये यशस्वीने स्लेजिंग करताना स्टार्कला वाईट पद्धतीने पराभूत केले होते, पण यावेळी त्याला तसे करता आले नाही.
IND vs AUS live: गोल्डन डक वर माघारी परतला यशस्वी जैस्वाल .
यशस्वीने स्टार्कचा चेंडू रेषेच्या बाहेर फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू स्विंग झाल्यामुळे थेट जयस्वालच्या पॅडवर गेला आणि अंपायरने त्याला आऊट देण्यात वेळ वाया घालवला नाही.
आऊट झाल्यामुळे निराश झालेल्या यशस्वीने येथे केएल राहुलसोबत एक छोटीशी चर्चा केली, परंतु पंचांच्या निर्णयावर रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला आणि तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
यशस्वीने पर्थमध्येच्या पहिल्या कसोटीमध्ये भारतच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याने पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुस-या डावात शानदार 161 धावा केल्या.
IND vs AUS live:यशस्वीच्या स्लेजिंगला स्टार्कच उत्तर..
पहिल्या सामन्यादरम्यान दोघांमध्ये झालेल्या किरकोळ बाचाबाचीला स्टार्कने दिलेले हे उत्तर मानले जात आहे. पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात जैस्वाल शानदार खेळ करत असताना त्याने स्टार्क खूप स्लो बॉलिंग करत असल्याचे सांगून स्टार्कला त्रास दिला होता.
सामन्यानंतर याबद्दल बोलताना स्टार्क म्हणाला होता की, मी जयस्वालकडून काहीही ऐकले नाही. मात्र यशस्वीच्या स्लेजिंगला हे प्रतिउत्तर समजले जात आहे.
ॲडलेड कसोटीसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन:
ऑस्ट्रेलियाचा प्लेइंग इलेव्हन- उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी, स्कॉट बोलँड, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन- केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, रोहित शर्मा (कर्णधार), आर अश्विन, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, मोहम्मद सिराज.
हेही वाचा: