India vs Bangladesh 2nd Test Weather Report: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कानपूर कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. या सामन्याचे दोन दिवस पावसामुळे वाया गेले AAHET. पहिल्या दिवसानंतर सलग चौथ्या दिवशी खेळ सुरू झाला.
चौथ्या दिवशी भारतीय संघाने कसोटीत टी-20 शैली दाखवली. त्यामुळे टीम इंडियाच्या विजयाच्या आशा वाढल्या आहेत. मात्र पाऊस भारताच्या विजयात अडथळा ठरू शकतो.
पाचव्या दिवशीही कानपूरच्या हवामानाचे ताजे अपडेट्स (India vs Bangladesh 2nd Test Weather Report) समोर आले आहेत. चला एक नजर टाकूया कसे असेल आज कानपूरचे हवामान? सामना संपूर्ण होईल की रद्द होईल हे सर्वस्व आज यावरच अवलंबून राहणार आहे..
आज कानपूरचे हवामान असे असेल? (India vs Bangladesh 2nd Test Weather Report)
अहवालानुसार, आज कानपूरमध्ये काही ढग दिसू शकतात. हवामान खात्यानुसार, कानपूरमध्ये 12 टक्के पावसाची शक्यता आहे. मात्र, सूर्यही बाहेर येताना दिसणार आहे. अशा स्थितीत आज पुन्हा सामना पूर्ण होण्याची शक्यता आहे.
आज कानपूर कसोटीचा पाचवा आणि शेवटचा दिवस असून, सामन्याचा निकाल आज लागणार आहे. ज्याची चाहते वाट पाहत आहेत. जिथे भारतीय संघ हा सामना जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यामुळे बांगलादेशही टीम इंडियाला स्पर्धा देत आहे.
Prince Shubhman Gill smashed a massive Century in the 2nd inning vs Bangladesh#shubhmangillfc7 #shubhmangill #shubhmangillfc7#teamindiacricket #INDvsBANLiveMatchToday #INDvsBAN#INDvsBAN #teamindiatest pic.twitter.com/EJRXNLax60
— IPL LATEST NEWS (@newsipl23) September 21, 2024
India vs Bangladesh:असा झाला चौथ्या दिवसाचा खेळ.
चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर संपला. त्यानंतर टीम इंडियाने पहिल्या डावात आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. पहिल्याच चेंडूपासून भारतीय संघाचे इरादे स्पष्ट झाले. कर्णधार रोहितने 23 धावांच्या छोट्या डावात 3 षटकार आणि 1 चौकार लगावला होता. याशिवाय यशस्वी जैस्वालने 51 चेंडूत 71 धावांची खेळी केली होती. ज्यात जैस्वालने 12 चौकार आणि 2 षटकार मारले.
केएल राहुलनेही अतिशय वेगवान खेळी खेळली, राहुलने 43 चेंडूत 68 धावा केल्या. ज्यामध्ये 7 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीने 47 आणि शुभमन गिलने 39 धावा केल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत बांगलादेश संघाने 2 गडी गमावून 26 धावा केल्या होत्या. भारतीय संघाकडे अजूनही 26 धावांची आघाडी आहे. आर अश्विनने चौथ्या दिवशी दोन्ही विकेट घेतल्या.
कानपूर कसोटीत टीम इंडिया चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत असले तर आता जर भारतीय संघाला हा सामना जिंकायचा असेल तर आज पाचव्या दिवशी बांगलादेशला ५० षटकांपूर्वी ऑलआऊट करावे लागेल. बांगलादेशने ५० पेक्षा जास्त षटके खेळल्यास सामना अनिर्णित होण्याच्या मार्गावर असेल.
आता टीम इंडिया बांगलादेशला असे करण्यापासून रोखू शकते का? हे पाहणे रंजक ठरणार आहे.. पाचव्या दिवसाचा खेळ सकाळी 10 वाजतापासून सुरु होईल आणि सायंकाळी 5:30 पर्यंत सामन्याचा निकाल येऊ शकतो.
हे पण वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..