ND vs AUS: भारतीय पुरुष संघ सध्या ऑस्ट्रोलीयाच्या दौऱ्यावर आहे. जिथे भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात बोर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला होता. आता सर्वांच्या नजरा ॲडलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाईट कसोटीकडे लागल्या आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 2020 मध्ये येथे झालेल्या डे-नाईट कसोटी सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.
अशा परिस्थितीत आता टीम इंडिया हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली लाही इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) ॲडलेड कसोटीमध्ये विराट कोहलीला इतिहास रचण्याची संधी!
दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय फलंदाज आहे. 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आता त्याच्याकडे दिवस-रात्र कसोटी सामन्यात आणखी एक शानदार शतक झळकावण्याची सुवर्णसंधी आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पर्थ कसोटी सामन्यातही विराट कोहली ने शतक झळकावले होते. अशा परिस्थितीत तो आता उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याचबरोबर ॲडलेड कसोटी सामन्यात विराट कोहली शतक झळकावण्यात यशस्वी ठरला तर तो व्हिव्हियन रिचर्ड्स आणि ब्रायन लारासारख्या दिग्गजांना मागे टाकेल.
ND vs AUS: विराट कोहली ठरू शकतो ओव्हल मैदानावर सर्वाधिक धावा करणारा खेळाडू.
खरे तर ॲडलेड ओव्हल वर सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. या मैदानावर त्याने 610 धावा केल्या आहेत.
या यादीत त्यांच्यानंतर सर व्हिव्हियन रिचर्ड्सचा क्रमांक लागतो. या मैदानावर त्याने कसोटीत 552 धावा केल्या आहेत. या मैदानावर विराट कोहलीने आतापर्यंत 509 कसोटी धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत विराटने ॲडलेडमध्ये 101 धावा केल्या तर तो या दिग्गजांना मागे सोडेल.
ॲडलेड ओव्हल कसोटीत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (Players Who scored most runs on Oval Ground)
ब्रायन लारा: 610 धावा
सर व्हिव्हियन रिचर्ड्स: 552 धावा
विराट कोहली*: 509 धावा
वॉली हॅमंड :482 धावा
लिओनार्ड हटन: 456 धावा
त्यामुळे आता उद्यापासून सुरु होणाऱ्या या कसोटी सामन्यात विराट कोहलीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तो एक शानदार शतक झळकावून हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर करू शकतो का नाही ? हे पाहणे रंजक ठरणार आहे..